market commitee.jpg 
सोलापूर

करमाळा बाजार समितीने कशी केली संकटाला तोंड देण्याची तयारी, ते वाचा 

सकाळ वृत्तसेवा

करमाळा (सोलापूर)ः कोरोना संकटातून सावरण्यासाठी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळे भाडेधारकांना भाडे माफ केले आहे. तसेच उत्पन्न वाढीसाठी नवा पेट्रोलपंप व नवीन गाळे उभारणीचा निर्णय घेतला आहे. संकटात मदत करण्यासोबत व उत्पन्न वाढीचे नियोजन या माध्यमातून बाजार समितीने अभ्यासपूर्ण पध्दतीने कोरोना संकटाचे आर्थिक व्यवस्थापन केले आहे. 

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने गाळाधारकांचे व जागा भाडेकरूचे 2 महीन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला आहे. बाजार समितीच्या अंतर्गत एकुण 141 गाळे धारक आहेत. तसेच खुल्या जागांचे 40 भाडेकरू आहेत. त्यांना कोरोना संकटात ही मदत केली जाणार आहे. 
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सभापती प्रा. शिवाजी बंडगर यांचे अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 
माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सर्व संचालक मंडळाशी चर्चा केली. कोरोना विषाणू संसर्गामुळे देशात व राज्यात सर्वत्र लॉकडाउन जाहीर केल्याने सर्वच उद्योग व्यवसाय बंद आहेत. अशा स्थितीत बाजारसमितीचे गाळे भाड्याने दिले आहेत त्या भाडेकरूंची देखील व्यापार नसल्याने अडचण झाली आहे. बाजार समितीचे अंकित गाळे व जागा भाडेकरूंचे 2 महिन्यांचे भाडे माफ करुन या भाडेकरूंना दिलासा देणेबाबत निर्णय घेणेबाबत मुद्दा उपस्थित केला. 

त्यास अनुसरून गाळा व जागा धारकांचे सन 2020-21या आर्थिक वर्षात 2 महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना संकटामध्ये त्यांचा 2 महिन्याचा 50 टक्के पगार देउ केला आहे. यावेळी संचालक चंद्रकांत सरडे, सुभाष गुळवे,संतोष वारे,अमोल झाकणे,आनंदकुमार ढेरे यांचे सह सर्व संचालक उपस्थित होते. सभेचे आभार सचिव सुनील शिंदे यांनी मानले. 

उत्पन्न वाढीचे प्रयत्न 
बाजार समितीचे उत्पन्नवाढीचे दृष्टीने जेऊर येथे पेट्रोल पंप व गाळे बांधण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे

- प्रा. शिवाजी बंडगर, सभापती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT