Read what the primary education officer said 
सोलापूर

प्राथमिकचे शिक्षणाधिकारी काय म्हणाले वाचा 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील प्राथमिकच्या ज्या शाळांना 20 टक्के अनुदान सुरू आहे त्या शाळांनी वाढीव 40 टक्के अनुदानासाठीची माहिती ईमेलवर पाठवण्याचे आवाहन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी केले आहे. 

वाढीव 20 टक्के अनुदानाचा मार्ग मोकळा 
राज्यातील कायम विनाअनुदान शब्द वगळलेल्या व शासन निर्णय 15 नोव्हेंबर 2011, 16 जुलै 2013 नुसार मूल्यांकनाचे निकष पात्र करीत असलेल्या व प्रत्यक्ष 19 सप्टेंबर 2016 पासून अनुदान घेत असलेल्या शाळा आणि 1 व 2 जुलै 2016 ला अनुदानासाठी घोषित केलेल्या शाळा, 1 एप्रिल 2018पासून 20 टक्के अनुदान घेत असलेल्या राज्यातील प्राथमिक शाळांना मागील शासनाने 20 टक्के अनुदान दिले होते. शासन निर्णयानुसार एप्रिल 2019 पासून वाढीव 20 टक्के अनुदानही मंजूर केले होते. परंतु, अद्याप त्या अनुदानाचे वितरण झालेले नाही. त्या शाळांना आता वाढीव 20 टक्के अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पत्राची अंमलबजावणी 
त्या 20 टक्के अनुदान घेत असलेल्या सर्व शाळांना वाढीव 20 टक्के अनुदान देण्यासाठी शासनाने माहिती मागितली आहे. त्यामध्ये एकूण कर्मचारी व होणारा आर्थिक बोजा याचा समावेश आहे. त्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील कक्ष अधिकाऱ्यांनी राज्यातील शिक्षण संचालक, उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना त्या शाळेबाबत पत्र काढले आहे. त्या पत्राची अंमलबजावणी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. त्याबाबतची माहिती प्रपत्रात 9 मे 2018 तील अटी तसेच 100 टक्के आधारकार्ड बायोमेट्रिक हजेरी, बिंदू नामावली, 2019-20 चा निकाल, शेवटच्या वर्गातील पटसंख्या या मूल्यांकनाच्या अटींची पूर्तता करत असल्याची माहिती प्रपत्र "अ' व "ब'मध्ये ss solapur@yahu.co.in या लिंकवर तत्काळ मेल करायला सांगितले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT