LOCKDOWN.jpg
LOCKDOWN.jpg 
सोलापूर

सोलापूरकरांचा संकल्पः बागकाम, मुलांसोबत खेळ व अभ्यासासोबत केलीय लॉकडाउनची तयारी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरात सुरू होणाऱ्या दहा दिवसीय लॉकडाउनसाटी नागरिकांनी गरजेच्या साहित्याची खरेदी करून दहा दिवस निर्धाराने घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला आहे.

लाॅकडाउनच्या कालावधीत सोलापूर शहरातील नागरिकांनी गरजे्च्या वस्तुंची खरेदी करून वाचन, बागकाम, मुलांचा अभ्यास व छंदासाटी वेळ देण्याचे ठरवले आहे. 


विधीविषयक वाचन करणार 
ऍड. प्रकाश भांगे यांनी सांगितले की, किराणा व भाजीपाला खरेदी केला आहे. दहा दिवस त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. कोरोना संकटासाठी असलेला सुरक्षेचा उपाय म्हणून सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य देखील आणले आहे. घरातून कोणालाही बाहेर पडण्याची गरज भासू नये अशी तयारी केली आहे. या दहा दिवसाच्या काळात औषधीसारखी अत्यावश्‍यक सेवा मिळणार आहे. मुलांसाठी चित्रकला, वाचन आदी गोष्टी करणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेले विधीविषयक वाचन देखील या कालावधीत करणार आहे. 

मुलांसोबत वाचन, बागकाम करणार 
सिध्देश्‍वर पार्क भागातील वैशाली डोंबाळे यांनी सांगितले की, किराणा व भाजीपाला आणला असून घराबाहेर पडायचेच नाही असा निश्‍चय केला आहे. दुध व मेडीकलची आवश्‍यक्ता भासली तर ते घेता येईल. मुलांचे वाचन या निमित्ताने करून घ्यायचे आहे. भाज्या कमी पडल्या तर कडधान्ये देखील वापरता येतील. कारण ताज्या भाज्या अगदीच काही दिवस टिकतात. त्यामुळे कडधान्याचा पर्याय उपलब्ध आहे. वाचनासोबत काही छंदाला वेळ देणार आहे. बागकामाची आवड असल्याने त्यामध्ये देखील दहा दिवस वेळ घालवता येणार आहे. 

मुलांसाठी आणले गेम 
विकास नगरातील स्वप्नाली जोशी यांनी लॉकडाउनमध्ये मुलांना कंटाळवाणे होऊ नये म्हणून आधीच तयारी केली आहे. त्यांच्यासाठी एक्‍स बॉक्‍स हे गेमचे साहित्य आणून ठेवले आहे. तसेच स्कॉटलंड यार्ड हा विशेष खेळ घरात उपलब्ध केला आहे. मुलांचा त्यामध्ये चांगला वेळ जाणार आहे. दहा दिवस काही कमी पडू नयेत म्हणून किराणा व इतर साहित्य आणले आहे. या शिवाय बागकामामध्ये वेळ देण्याचे ठरवले आहे. मुलांना कंटाळवाणे होणार नाही याकडे अधिक लक्ष देण्याचे ठरवले आहे. 

वाचनाला मिळेल थोडा अधिक वेळ 
डॉ.मनोज राजे यांनी सांगितले की, व्यवसायाने डॉक्‍टर असल्याने वैद्यकीय सेवेत घरातील सदस्य व्यस्त असतात. दहा दिवस पुरेल एवढा अत्यावश्‍यक वस्तुंचा साठा केला आहे. आपण अधिक साठा केल्यास इतरांना कदाचीत मिळणार नाही याचा विचार साठा करताना केला आहे. केवळ गरज भागेल एवढ्याच गोष्टी साठवल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात नेहमी प्रमाणे सुरु असलेल्या वाचनाला अधिक वेळ देता येणार आहे. लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन उत्कृष्ट पध्दतीने सहभाग नोंदवणार आहे. 

घरासमोरील झाडांची करणार देखभाल 
व्होटगी रोड भागातील प्रसन्न पुकाळे यांनी सांगितले की, मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरु असल्याने त्यांच्यासाठी लागणाऱ्या वह्या व इतर साहित्य आणले. घरात आईची औषधी साठा केला आहे. सर्व अत्यावश्‍यक वस्तु देखील घरात आणून ठेवल्या आहेत. मुलांचा दहा दिवस अभ्यास व फावल्या वेळात टीव्ही असेल. घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेतील झाडांची देखभाल करायची आहे. या पुर्वी देखील लॉकडाउनचा अनुभव असल्याने घरातील सर्व जण पुर्वीप्रमाणे घरातच वेळ घालवणार आहेत. बागकामाची आवड असल्याने दहा दिवस वेळ सहज घालवता येणार आहे. 

घरात लागणारी औषधी आणून ठेवली 
पुना नाका भागातील गणेश आदमाने यांनी सांगितले की, आम्ही घरात लॉकडाउनमध्ये लागणारा किराणा भरून ठेवला आहे. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. घरात मुलांना खेळण्यासाठी मासे, कासव व कुत्रा असल्याने त्यांच्यासोबत त्यांचा वेळ जातो. आई व वडीलांना लागणारी सर्व औषधी जास्तीची खरेदी करून ठेवली आहे. मात्र लॉकडाउन कडकपणे झाले पाहिजे. त्याशिवाय कोरोनाचा संसर्ग थांबणार नाही. या पुर्वीचा लॉकडाउन देखील कडकपणे आम्ही पाळला होता.याही वेळी लॉकडाउनमध्ये कोणत्याही स्थितीत बाहेर पडायचे नाही असे ठरवले आहे. त्या दृष्टीने आवश्‍यक ती तयारी केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT