anganwadi sevika bharati strated 
सोलापूर

खुशखबर...अंगणवाडी सेविकांची भरती सुरु...अधिक माहिती जाणून घ्या 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यातील अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनिसांच्या सहा हजार 500 पदांची भरती 553 एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत सुरु झाली असून 15 मार्चपर्यंत प्रक्रिया संपविण्याचे नियोजन महिला व बालविकास विभागाने केले आहे. राज्यातील बेरोजगारी पाहता साडेसहा हजार जागांसाठी तब्बल एक लाख अर्ज येतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांची यादी संबंधित ग्रामपंचायतींबाहेर लावून पादरर्शक निवड करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 


महाविकास आघाडीने राज्यातील सुशिक्षित तरुण- तरुणी, महिलांच्या नोकरीला प्राधान्य दिले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात आठ हजार पोलिसांच्या भरतीचा निर्णय घेतला. त्यानुसार पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी 18 जानेवारीला पदभरतीचा निर्णय घेतला आणि आता अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या भरती प्रक्रियेला प्रारंभही झाला. राज्यात 97 हजार 260 अंगणवाडी केंद्रे आहेत, तर 11 हजार 84 मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. त्याअंतर्गत चार हजार पर्यवेक्षिका आणि दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. वाढीव मानधनासह अंगवाडी सेविकांना आता आठ हजार 500 रुपये तर मदतनीस महिलेला चार हजार 500 रुपये मानधन दिले जात आहे. गावातील महिलेला गावातच काम मिळणार असल्याने अर्जाची संख्या वाढेल, असा अंदाज आहे. अर्जाची छाननी करुन गुणवत्ता पात्र महिलेला संबंधित पदावर नियुक्‍ती दिली जाणार आहे. 


गावातील महिलाच त्या अगणवाडीसाठी पात्र 
राज्यातील 553 एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित गावातील महिलाच त्या पदांसाठी पात्र असतील. अर्जदारांची गुणवत्ता यादी संबंधित ग्रामपंचातीबाहेर लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
- जामसिंग गिरासे, उपायुक्‍त, आरोग्य व कुपोषण, मुंबई 


ठळक बाबी... 

  • मदतनीस महिला कर्मचाऱ्यांना सेविका पदांवर मिळणार पदोन्नती 
  • गावातील रहिवाशी दाखला असलेल्या महिलांनाच करता येणार अर्ज 
  • 15 मार्चपूर्वी साडेसहा हजार पदांची भरती करण्याचे महिला व बालविकास विभागाचे नियोजन 
  • बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या 45 पदांसाठी दहा हजारांपर्यंत अर्ज 
  • नव्या 98 अंगणवाड्या अन्‌ 745 मिनी अंगणवाड्यांमध्ये नव्या सेविका व मदतनीस महिलांची भरती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT