Religious rituals in the Chandrabhaga River in Pandharpur area were closed 
सोलापूर

तीर्थक्षेत्र पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या वाळवंटातील धार्मिक विधी केले बंद

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर चंद्रभागा वाळवंटात होणारे दशक्रिया व श्राद्ध अशा धार्मिक विधीला बंदी केली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी आज दिली. 

पंढरपूर येथे महाराष्ट्रभरातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्याच पद्धतीने चंद्रभागा नदीच्या वाळवंटात दशक्रिया विधीसाठी येतात. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने राज्यासह अनेक राज्यांतून लोक दशक्रिया विधी व श्राद्ध असे धार्मिक विधी करण्यासाठी येतात. या निमित्ताने चंद्रभागा वाळवंटात मोठी गर्दी होते. "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर वाळवंटातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय पुढील अनिश्‍चित काळासाठी घेतला आहे. 


शनिवारी चंद्रभागा वाळवंटात दशक्रिया विधी सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी मिळाली. त्यानंतर तत्काळ मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्यासह अधिकारी चंद्रभागा वाळवंटात पोचले. त्या ठिकाणी होणारा दशक्रिया विधी थांबवण्यात आला. तसेच दशक्रिया विधी करणाऱ्या पुजाऱ्याला नोटीसही देण्यात आली आहे. या वेळी चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिर बंद करण्याबाबत मंदिराच्या विश्‍वस्तांना सूचना दिल्याचेही श्री. ढोले यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sawantwadi Railway : सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या विस्ताराला ब्रेक? मळगावातील प्रस्तावित बांधकामाविरोधात प्रवासी संघटना आक्रमक, 'त्या' निर्णयामुळे भविष्यातील विस्तार होणार कठीण?

पाठदुखीला साधं समजू नका! असू शकतं ‘या’ कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण; इतर संकेतही वेळीच ओळखा

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

SCROLL FOR NEXT