sarpanch 
सोलापूर

सांगोला तालुक्‍यात आरक्षणाची उत्सुकता संपली पण आता सरपंच कोण होणार, याची लागली चिंता

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला तालुक्‍यातील सरपंच आरक्षण सोडतीची उत्सुकता संपली असून, तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जमातीसाठी एक, अनुसूचित जातीसाठी (महिला व पुरुष) 15, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (महिला व पुरुष) 21 तसेच राहिलेल्या सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी 39 ग्रामपंचायतींची सोडत झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील यांनी दिली. 

येथील अहिल्यादेवी होळकर सभागृहात सकाळी 11 वाजता तालुक्‍यातील सर्व 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या आरक्षण सोडतीस सुरवात झाली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित सावर्डे-पाटील यांच्यासह गटविकास अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार किशोर बडवे उपस्थित होते. या वेळी नुकत्याच झालेल्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमधील तसेच राहिलेल्या 15 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत आजच झाली. आरक्षण सोडतीच्या नियमानुसार चिठ्ठ्यांद्वारे ही आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतीमधील जवळा, घेरडी, चिंचोली, शिरभावी, हातीद, एखतपूर, चोपडी, अजनाळे, बामणी ही गावे सर्वसाधारण महिला व पुरुषांसाठी राहिली आहेत. या वेळी बिनविरोध झालेले मेथवडे हे गाव अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असून संगेवाडी, वाणीचिंचाळे, हलदहिवडी, मांजरी, वाढेगाव यांसारख्या ग्रामपंचायतींची सरपंचपदे अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव झाली आहेत. तसेच धायटी, बलवडी, खवासपूर चिणके या ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. 

मात्र आरक्षण पडल्यानंतर त्याच संवर्गातील दोन सदस्य एकाच गटात असल्यास सरपंचपद कोणाला द्यायचे, हा वाद निर्माण होणार असून, पॅनेल प्रमुख व नेत्यांना याची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. 

ठळक... 

  • अनुसूचित जमाती : मेथवडे 
  • अनुसूचित जाती : यलमार मंगेवाडी, गायगव्हाण, राजुरी, लक्ष्मीनगर, सोनलवाडी, जुनी लोटेवाडी / नवी लोटेवाडी / सातारकरवस्ती व कडलास 
  • अनुसूचित जाती महिला : संगेवाडी, वाणीचिंचाळे, हलदहिवडी, चिकमहूद / जाधववाडी / बंडगरवाडी, गौडवाडी, नाझरे / सरगरवाडी, मांजरी / देवकतेवाडी, वाढेगाव. 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग : धायटी, बलवडी, पारे, डिकसळ, खवासपूर, वाकी - शिवणे / नरळेवाडी, चिणके, हंगीरगे / गावडेवाडी, आलेगाव, बुरंगेवाडी. 
  • नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : खिलारवाडी, पाचेगाव बुद्रूक, जुनोनी/ काळूबाळूवाडी, वझरे, कोळा / कोंबडवाडी / कोंबडवाडी, सोनंद, नराळे / हबिसेवाडी, अनकढाळ, मानेगाव, राजापूर, पाचेगाव खुर्द / मिसाळवाडी / नलवडेवाडी. 
  • सर्वसाधारण महिला : डोंगरगाव, हणमंतगाव, गळवेवाडी, उदनवाडी / कारंडेवाडी / झापाचीवाडी, भोपसेवाडी, तरंगेवाडी, वाकी घेरडी, महुद बुद्रूक / ढाळेवाडी, मेडशिंगी/ बुरलेवाडी, घेरडी, बुद्धेहाळ / करांडेवाडी, अचकदाणी, एखतपूर, अकोला, तिप्पेहळ्ळी, चोपडी/ बंडगरवाडी, अजनाळे, बामणी आणि हटकर मंगेवाडी. 
  • सर्वसाधारण : चिंचोली, शिरभावी / मेटकरवाडी, किडबिसरी, सावे, हातीद, कटफळ, कमलापूर/ गोडसेवाडी, वाटंबरे, जवळा, शिवणे, जुजारपूर/ गुणाप्पावाडी, सोमेवाडी, इटकी, बागलवाडी, निजामपूर, लोणवीरे, आगलावेवाडी, महिम/ कारंडेवाडी, वासूद/ केदारवाडी, देवळे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT