The restricted area will remain sealed even after the lockdown 
सोलापूर

मोठी बातमी! लॉकडाउनची मुदत संपली तरी कोरोनाबाधित परिसर राहणार लॉकडाउनच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांमुळे शहरातील 17 किलोमीटरपर्यंतचा परिसर पोलिसांनी प्रतिबंधित केला आहे. देशातील लॉकडाउनची मुदत 3 मे संपणार आहे. परंतु, खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरातील संचारबंदी 4 मेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश काढले.
सोलापूर शहरात सोमवारपर्यंत (ता. 27) कोरोनाबाधित 65 रुग्ण आढळले आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार शास्त्रीनगर पोलीस चौकी हद्दीतील मार्कंडेय बालाजी मंदिराचा मुख्य रस्ता, 70 फूट रोड येथे घोडेवाल्याचा समोरचा रस्ता, ममता पिठाची गिरणी येथील रस्ता, या बाजूने शास्त्रीनगर असा एक किलोमीटरचा परिसर, मोहसीन चौक, राम मंदिराच्या डाव्या बाजूकडून येणारा रस्ता, भगतसिंग मार्केटसमोरील मुख्य रस्ता, असा एक किलोमीटरचा परिसर आणि प्राणी संग्रहालयाकडे जाताना रेल्वे ब्रिजखालील बोगद्यासमोरील रस्ता, दुर्गामाता मंदिरासमोरील मोठा रस्ता, पत्रकार भवन चौक, चिंतलवार वस्तीजवळील रस्ता, मासिहा चौक हा परिसर 4 मेपर्यंत प्रतिबंधीत राहणार आहे. 

हेही वाचा : डॉक्‍टर नर्स नंतर कोरोनाच्या विळख्यात सोलापुरातील नगरसेवकही
दुधासाठी तीन तर वस्तू खरेदीसाठी दोन तास

शहरातील ज्या भागात कोरोना अथवा सारीचा रुग्ण सापडला आहे, त्या भागात विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून या भागात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश दिला जात नाही. पोलीस आयुक्तांनी या परिसरातील नागरिकांना दूध खरेदीसाठी सकाळी 6 ते 9 अशी वेळ देण्यात आली आहे. तर जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी 11 ते दुपारी एकची वेळ देण्यात आली आहे. या भागात घरपोच सेवेला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT