A route march was organized by the police for the by-election of Pandharpur Mangalwedha assembly constituency.jpg 
सोलापूर

निवडणुकीनिमित्त मंगळवेढा पोलिसांचा रूट मार्च; शंभर जवान, सहा अधिकाऱ्यासह गाड्यांचा फौजफाटा

महेश पाटील

सलगर बुद्रुक (सोलापूर) : माजी आमदार कै. भारत भालकेंच्या अकाली निधनानंतर होत असलेल्या २५२ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने मंगळवेढा पोलिसांकडून रूट मार्चचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

दरम्यान या रूट मार्चमध्ये ८० सी आर पी एफचे जवान, २० होमगार्ड, सहा अधिकारी व पाच ते सहा गाड्यांचा फौजफाटा अशा लवाजम्यासह या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवेढयातील बोराळे, नंदुर, बालाजी नगर, हुलजंती, सलगर खुर्द, सलगर बुद्रुक आदी गावामध्ये या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. पोलिस गाड्यांचा एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून नागरिकांची धावपळ पहायला मिळाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसी लवाजमा पाहून कुठे काय भांडण वगैरे तर झाले नसेल ना, काय गंभीर घटना तर घडली नसेल ना? याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती. परंतु निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडावी, गावात भांडण तंटे होऊ नये, यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता यावी म्हणून हा रूट मार्च असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India : अजित आगरकरची शेवटची मिटींग अन् रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला; नेमकं काय शिजतंय? उद्याचा दिवस महत्त्वाचा

Woman biker hit and run: महिला रायडरला धडक देणारा कारचालक नेमका कोण? राजस्थानमधून केली अटक, व्हिडीओ झाला होता व्हायरल

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

SCROLL FOR NEXT