Chakankar
Chakankar 
सोलापूर

बार्शी पालिकेने दिशाभूल न करता दिलेला शब्द पाळावा : रूपाली चाकणकर यांनी घेतले फैलावर 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : "बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दोन वर्षांत साफसफाई नाही, कोणतेही नियोजन पालिकेचे दिसले नाही. नाल्यावर बांधकाम केले असून घरांमध्ये पाणी शिरले आहे. कुटुंबं उद्‌ध्वस्त झाली. आधार देणे गरजेचे असताना पालिकेने हात वर केले आहेत. दिशाभूल न करता पालिकेने दिलेला शब्द पाळावा', अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पालिकेला फैलावर घेतले. 

बार्शी शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर चाकणकर यांनी शहर व तालुक्‍यातील मंगळवार पेठ, बारंगुळे प्लॉट, मांगडे चाळ, पारधी कॅम्प, सौंदरे व वैराग या भागांची पाहणी केली. त्यानंतर सावळे सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी प्रदेश उपाध्यक्षा जयमाला गायकवाड, प्रदेश सरचिटणीस सुवर्णा बागल, जिल्हा निरीक्षक दीपाली पांढरे, जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, ओबीसी अध्यक्षा साधना राऊत, तालुका अध्यक्षा सुप्रिया गुंड - पाटील, शहर अध्यक्ष अमोल आंधळकर, विक्रम सावळे, निरंजन भूमकर, जिल्हाध्यक्षा दीपाली पांढरे, ऍड. हर्षवर्धन बोधले आदी उपस्थित होते. 

चाकणकर पुढे म्हणाल्या, पालिकेची सत्ता घेताना सत्ताधाऱ्यांनी घरपट्टी माफ करणार हा शब्द दिला होता. सत्तेत आले आणि आता घरपट्टी मागत आहेत. पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. पाण्याचे फोटो पाहिले तर अंगावर काटा येतो. या घटनेचा जाब विचारणार आहे. आपत्ती यंत्रणा काम करू शकली नाही. भुयारी गटार योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च केले ते फक्त कागदावर दिसत आहेत. काय केले हा मोठा प्रश्न आहे. लेखाजोखा मागितला जाईल. सहन करणार नाही. 

पालिकेच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी. लेंडी नाल्यावर शॉपिंगला मंजुरी कोणी दिली? आठ महिने झाले लढा देतोय, उद्योग - व्यवसाय बंद पडलेत. नागरिक बेरोजगार झाले असताना घरपट्टी मागत आहेत. घरांसमोर गटारी नाहीत, असेही या वेळी चाकणकर यांनी स्पष्ट केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापुरात आज बाईक रॅली

SCROLL FOR NEXT