Russia Ukraine War difficult for Indian students to return home Sakal
सोलापूर

Russia Ukraine: मंगळवेढ्याचे पाच जण सुखरूप मायदेशी

27 फेब्रुवारी चे विमान तिकीट बुक केले परंतु युध्दामुळे विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांना तिथेच अडकून राहावे लागले होते.

हुकुम मुलाणी

मंगळवेढा : सकाळ वृत्तसेवा युक्रेन व रशिया या दोन देशातील युध्दामुळे विमानसेवा ठप्प झाल्याने अडकून पडलेल्या तालुक्यातील पाच विद्यार्थ्यी दुपारी साडे बाराच्या दरम्यान दिल्ली येथील विमानतळावर उतरल्यामुळे या विद्यार्थ्यांसह पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला

वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनला गेलेल्या तालुक्यातील अभिजीत काका चव्हाण (आंधळगाव), प्रथमेश अनिल माने (दामाजीनगर), प्रथमेश शिवाजी कांबळे (ब्रम्हपुरी), रितेश बाजीराव गवळी (भालेवाडी), प्राजक्ता दादा भोसले(नागणेवाडी) यांनी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन मधील दनिप्रो मेडिकल इंस्टिट्यूट मध्ये प्रवेश घेतला. यातील काही पहिल्या व काही तिसऱ्या वर्षाला शिकत होते. रशिया आणि युक्रेन यांच्या वादात सुरू झालेल्या युद्धामुळे त्या मुलांनी मायदेशी परत येण्यासाठी 27 फेब्रुवारी चे विमान तिकीट बुक केले परंतु युध्दामुळे विमानसेवा बंद झाल्यामुळे त्यांना तिथेच अडकून राहावे लागले.

अडकलेल्या मुलांशी पालकांचा त्यांचा सातत्याने संपर्क होत असून आपण मुलांनी देखील आपण सुखरूप असल्याचे पालकांना सांगितले.युक्रेनमधून त्यांनी बाराशे किलोमीटरचा बस द्वारे व 2 किलोमीटर चालत प्रवास करून रोमानिया मध्ये प्रवेश घेतला व त्या ठिकाणी सुरक्षित थांबले काल त्यांना सुचेवा विमानतळावरून विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भारतीय प्रमाण वेळेनुसार 12.30 वाजता हे विमान निघाले असून ते दिल्ली येथे दु.12 वा पोहोचले यामध्ये मंगळवेढ्यातील पाच विद्यार्थ्यांसह पुणे सांगोला मुंबई सांगली येथील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

गेले आठ दिवस हे विद्यार्थी युद्धजन्य परिस्थितीत अडकल्यामुळे तालुक्यातील लक्ष युक्रेन व रशिया च्या युद्धजन्य पालकांसह तालुका वासियांचे घडामोडीवर होते.आ. समाधान आवताडे यांनी मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भेट घेऊन परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्याबाबत विनंती केली होती दरम्यान त्यांना पुणे येथे येण्यासाठी विमान सेवा उपलब्ध नसल्यामुळे आज महाराष्ट्र सदन येथे हे विद्यार्थी थांबले असून उद्या पुणे येण्यासाठी विमान उपलब्ध होणार आहे मुले सुखरूप आल्यामुळे पालकांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले.असले तरी मुलाच्या भविष्यातील शिक्षणाची चिंता मात्र लागून राहिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Announcement: 'जनसुनावणी'वेळी झालेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Ajinkya Rahane नंतर कोण होणार मुंबईचा कर्णधार? श्रेयससोबत शर्यतीत ३३ वर्षीय खेळाडू; MCA कडे आहेत 'हे' तीन पर्याय

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

SCROLL FOR NEXT