सोलापूर : मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणाऱ्या सोलापुरातील नीलम श्रमजीवी नगरातील आशा मराठी विद्यालय व श्री. धर्मण्णा सादूल प्रशालेने लॉकडाउनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबविला आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांकडे अँड्रॉइड मोबाईल सोडाच, साधे मोबाईलही नाहीत. त्यामुळे त्यांच्या घराच्या भिंती बोलक्या करून त्यावर प्रत्येक विषयाचा अभ्यास रंगविण्यात आला आहे. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली आहे.
घराच्या भिंतींवर अक्षर, गणितीय आकडेमोड, भौगोलिक घडामोडी, सामान्य ज्ञान, गणिती कोडे, शब्दकोडे, स्वच्छतेचे संदेश, चांगल्या सवयी, कोरोना काळात घ्यावयाची काळजी याची आकर्षक चित्रकृती काढण्यात आली आहे. ही संकल्पना आशा मराठी विद्यालयातील शिक्षक राम गायकवाड यांची असून, या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष हारुण पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. तर आशा मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तस्लीमबानो पठाण, आफरीन सय्यद, सचिव मुमताज शेख, आसिफ पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले. आता नीलम श्रमजीवी नगरातील मुले ऑनलाइनपेक्षाही या ऑफलाइन शिक्षणात रमले आहेत. राज्यातील हा पहिलाच अनोखा उपक्रम असून, ऑनलाइन शिक्षणावर प्रशालेने शोधलेल्या पर्यायाचे पालकांकडून कौतुक होत आहे.
हेही वाचा : व्याजाने दिलेल्या पैशासाठी मारहाण ! राष्ट्रवादीचे नगरसेवक किसन जाधवसह पाच जणांविरुद्ध गुन्हा
ठळक बाबी...
आशा मराठी विद्यालयातील शिक्षक राम गायकवाड यांची संकल्पना
नीलम श्रमजीवी नगरातील तीनशे घरांच्या भिंती रंगविण्याचे प्रशालेचे उद्दिष्ट
भिंती रंगविण्यासाठी प्रशालेचे अर्थसहाय; शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचाही हातभार
हातावरील पोट असलेल्यांकडे नाहीत अँड्रॉइड मोबाईल; ऑनलाइनवर शोधला पर्याय
बोलक्या भिंतींचा श्रमजीवींच्या मुलांना आधार; अडचणी सोडविण्यासाठी शिक्षक घेतात आढावा
विद्यार्थ्यांची टिकून राहिली शिक्षणाची गोडी
या उपक्रमाबाबत धर्मण्णा सादूल प्रशालेच्या मुख्याध्यापिका आफरीन सय्यद म्हणाल्या, लॉकडाउनमध्ये "शाळा बंद आणि शिक्षण सुरू' या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, सोलापुरातील श्रमजीवी नगरात राहणाऱ्या मजुरांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत. अशा परिस्थितीत त्या विद्यार्थ्यांची शिक्षणातील गोडी कायम राहावी, या हेतूने प्रशालेच्या माध्यमातून त्यांच्या घरांच्या भिंतींवर प्रत्येक विषयाचा अभ्यास रंगविण्यात आला आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.