ab3d300b-ddfa-4042-baab-8b7861dc2a7e.jpg
ab3d300b-ddfa-4042-baab-8b7861dc2a7e.jpg 
सोलापूर

कोळसा तयार करणाऱ्या कामगारांना धान्य 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : काटेरी झुडपे तोडून त्याच्यापासून कोळसा तयार करण्याचा व्यवसाय करणारे रोहा (जि. रायगड) येथील कामगार एक महिन्यापासून लॉकडाउनमुळे सोलापुरात अडकून पडले. त्यांच्यासमोर जगायचे कसे हा प्रश्‍न उभा राहिला आहे. याबाबत "सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीने मदत पोचवली. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे रोहा (जि. रायगड) येथील कोळसा तयार करणारे कामगार अडकून पडले आहेत. त्यांचा मुकादम मात्र पळून गेल्याने त्यांच्यासमोर आता जगायचे कसे असा प्रश्‍न उपस्थित झाला होता. मात्र, "सकाळ'ने त्यांची व्यथा मांडल्यावर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी ही बातमी वाचून उत्तर सोलापूरचे तहसीलदार जयवंत पाटील यांना त्या नागरिकांना अन्न, धान्य व लागेल ती मदत करण्याचा आदेश दिले. तहसीलदार श्री. पाटील यांनी उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन घेत मंगळवारी रोहा येथील नागरिकांची भेट घेतली व त्यांना पाच किलो तांदूळ, एक किलो दाळ, एक किलो तेल, एक किलो साखर शासनाच्या वतीने दिले. 

नऊ कुंटुंबाला 15 दिवस पुरेल धान्य दिले 
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार त्यांची भेट घेतली. या ठिकाणी नऊ कुटुंबातील 30 नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना 15 दिवस पुरेल इतके धान्य देण्यात आले आहे. 
- जयवंत पाटील, तहसीलदार, उत्तर सोलापूर  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT