crop.jpg 
सोलापूर

सांगोला तालुक्‍याची नजर पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला(सोलापूर) : कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करत असताना महसूल विभागाला पैसेवारी काढण्याची दुहेरी कसरत करावी लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 30 सप्टेंबर रोजी सांगोला तालुक्‍याची नजरअंदाज आकडेवारी जाहीर केली असून नजरअंदाज 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. यंदा दमदार पाऊस पडल्याने नजर अंदाज वाढला असून आता सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

यंदा सांगोला तालुक्‍यात मान्सूनच्या पहिल्या दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. गेल्या 20 ते 25 वर्षात पडला नाही एवढा पाऊस तालुक्‍यात झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनके गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने सांगोला तालुक्‍याला जबर फटका दिल्याने अंतिम पैसेवारी ही 45 पैसे आली होती. सध्या सांगोला तालुक्‍यात पिकांची स्थिती उत्तम असल्याने चित्र बदलले आहे. यंदा प्रचंड प्रमाणात पाऊस झाला असला तरी नुकसानीमुळे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

पावसाची परिस्थिती पाहता सांगोला तालुक्‍याचा नजर अंदाज हा 50 पैशापेक्षा जास्त आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात सुधारित पैसेवारी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण सुधारित पैसेवारी बहुतांश वेळी अंतिम पैसेवारी असते. त्यात सहसा बदल होत नाहीत. गतवर्षीप्रमाणे ऑक्‍टोबरमध्ये परतीचा पाऊस बरसला नाही म्हणजे झाले अशी भावना शेतकरीवर्ग व्यक्त करत आहेत. आता 31 ऑक्‍टोबरला सुधारित पैसेवारी तर 31 डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर होईल. त्याकडे सध्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणि परतीच्या पावसाची ही धास्ती लागली आहे. 
पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त असली तरी सतत पडणारा पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिकांच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. हजारो हेक्‍टर वरील पिके अद्यापही कापणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतांमध्ये पाणी असल्याने पिके काढणीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नजरअंदाज पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त असून यंदा पिके पाण्याखाली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होत असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होता, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

SCROLL FOR NEXT