Reservation 
सोलापूर

इच्छुकांचे स्वप्न भंगले ! मंगळवेढा 79 ग्रामपंचायतींपैकी 48 जागांवर सर्वसाधारण गटाचा सरपंच 

हुकुम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. त्यामध्ये 10 जागा मागासवर्गीयांसाठी, 21 जागा इतर मागास वर्गासाठी तर 48 जागा या सर्वसाधारणसाठी राखीव झाल्या. मनासारखे आरक्षण न झाल्याने काहींनी सोडतीतून माघारी जाणे पसंत केले. 

या वेळी झालेल्या सोडतीत मागील 23 ग्रामपंचायतींचे आरक्षण राखीव नसल्यामुळे त्यातील 10 ग्रामपंचायतीत अनुसूचित जाती राखीव ठेवण्यात आल्या. तर नव्याने झालेल्या चोखामेळा नगर, दामाजी नगर या ग्रामपंचायतीचे आरक्षण इतर मागासवर्गीयांसाठी राखीव झाले तर 21 ओबीसी आरक्षणामधील 11 जागा चिठ्ठीद्वारे निश्‍चित झाल्या. उर्वरित 48 जागांमधील 18 जागा महिलांसाठी केल्या तर 6 जागा चिठ्ठीद्वारे निश्‍चित केल्या. तालुक्‍यातील लक्षवेधक झालेल्या बोरोळे, नंदेश्वर ,सिद्धापूर महिला राखीव तर भोसे ओबीसी, सलगर बु., हुलजंती सर्वसाधारणसाठी राहिले. या वेळी तहसीलदार स्वप्नील रावडे, निवासी नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, महसूल नायब तहसीदार साळुंके, निवडणूक शाखेचे उमाकांत मोरे, महावीर माळी, इलियास चौधरी आदी उपस्थित होते.

गाव आरक्षण पुढीलप्रमाणे... 

  • अनुसूचित जाती स्त्री : बठाण, घरनिकी, चिक्कलगी, तामदर्डी, हाजापूर 
  • अनुसूचित जाती पुरुष : कागष्ट, डिकसळ, शिरसी, मुंढेवाढी, गणेशवाडी 
  • ओबीसी पुरुष : चोखोमेळा नगर, दामाजी नगर, बावची, निंबोणी, भालेवाडी, येड्राव, येळगी, रहाटेवाडी, लक्ष्मी दहीवडी, शेलेवाडी 
  • ओबीसी स्त्री : खवे, खोमनाळ, खुपसंगी, पौट, पडोळकरवाडी, जालीहाळ - सिद्धनकेरी, डोंगरगाव, धर्मगाव, गोणेवाडी, भोसे, नंदूर 
  • सर्वसाधारण महिला : लमाणतांडा, मल्लेवाडी, माचणूर, कचरेवाडी, नंदेश्वर, रेवेवाडी, गुंजेगाव, उचेठाण, ढवळस, रड्डे, सलगर खु, लवंगी, माळेवाडी, हिवरगाव, ब्रह्मपुरी, सोड्डी, फटेवाडी, अकोला. 
  • तर बोराळे, महमदाबाद हु, सिद्धापूर, शिरनांदगी, तळसंगी, जित्ती या गावांचे आरक्षण चिठ्ठीवर निश्‍चित करण्यात आले. 
  • सर्वसाधारण : आसबेवाडी, मरवडे, लेंडवे चिंचाळे, तांडोर, मुढवी, महमदाबाद शे., डोणज, अरळी, कर्जाळ- कात्राळ, हुलजंती, सलगर बु, पाठखळ - मेटकरवाडी, खडकी, भाळवणी, आंधळगाव, देगाव, मानेवाडी, मारोळी, लोणार, हुन्नूर, जंगलगी, शिवनगी, मारापूर, जुनोनी. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT