School painted by young people during quarantine 
सोलापूर

भारीच... तरुणांनी क्वारंटाइन काळात शाळा रंगविली 

सकाळ वृत्तसेवा

नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) : गुरसाळे (ता. माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाइन झालेल्या रवींद्र झेंडे, नितीन चव्हाण, प्रवीण झेंडे व दत्तात्रेय रणदिवे या युवकांनी शाळेतील वर्गखोल्या रंगविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 
क्वारंटाइनचा सदुपयोग व्हावा, आपल्या शाळेचे स्वरूप बदलावे या उद्देशाने स्वतः पेंटिंग काम करणाऱ्या या तरुणांनी राहुल जगताप, गावकामगार तलाठी समाधान पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला. प्रस्तावाचा विचार करून राहुल जगताप यांनी रंगासाठी 11 हजार रुपये देऊन आरंभ केला. समाधान पाटील, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक व शाळेतील सर्व शिक्षकांनी एक हजार रुपये देऊन यात भर घातली. गावातील युवकांनी सर्व साहित्य जमा केले. गावकऱ्यांच्या मदतीने शाळा रंगवण्याचे काम सुरू झाले. 
14 दिवसांच्या वेळेत या युवकांनी आपल्या शाळेचे रूप पालटले आहे. कोरोनानंतर शाळा सुरू झाल्यावर नवीन रूपातील शाळा पाहून विद्यार्थी आनंदी होतील यांत शंका नाही. शाळेच्या एकूण खोल्या 5 (20*14) बाहेरचा कट्टा, पाण्याची टाकी, वॉल कंपाउंड, व्हरांडा, पोर्च, कॉलम, संपूर्ण बिल्डिंग आतून, बाहेरून असे मिळून 125 ब्रास रंग देण्यासाठी साधारणपणे एक लाख 25 हजार खर्च आला असता तो 40 हजारांमध्ये या युवकांच्या स्वयंप्रेरणेने पूर्णत्वास जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT