शाळा बंद होणार नाहीत! विद्यार्थ्यांची दररोज 'या' वेळेतच शाळा esakal
सोलापूर

शाळा बंद होणार नाहीत! विद्यार्थ्यांची दररोज 'या' वेळेतच शाळा

शाळा बंद होणार नाहीत! विद्यार्थ्यांची दररोज 'या' वेळेतच शाळा

तात्या लांडगे

कोरोनाची दुसरी लाट ओसरली, तरीही शालेय शिक्षण विभागाने मुलांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली आहे.

सोलापूर : कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट ओसरली, तरीही शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) मुलांच्या बाबतीत सावधगिरी बाळगली आहे. पूर्ण दिवसभर शाळा (School) न भरविता सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंतच मुलांची शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शाळा सुरू आहेत. दोन वर्षांनंतर नियमित शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने नियोजन त्या कार्यशाळांमधून केले जात आहे. (Schools in the district will be maintained with caution from Corona)

सोलापूर जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पाच लाखांपर्यंत आहे. जिल्हा परिषदेच्या दोन हजार 789 तर, माध्यमिक विभागाच्या एक हजार 87 शाळा आहेत. तसेच शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शाळांची संख्या 58 तर माध्यमिक शाळा सहा आहेत. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, त्यांनी दोन शिफ्टमध्ये शाळा भरवाव्यात अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या पालकांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस (Covid Vaccine) घेणे आवश्‍यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या (Students) गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. तसेच आता शिष्यवृत्तीत विद्यार्थी अव्वल असावेत या हेतूने त्या शिक्षकांचीही कार्यशाळा नियोजित आहे. त्यानंतर शाळांमधील लिपिक आणि विषय शिक्षकांचीही कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दोन वर्षांनंतर नियमित शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने नियोजन त्या कार्यशाळांमधून केले जात असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर (Bhaskarrao Babr) यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेलाच प्राधान्य

जिल्ह्यातील सर्व शाळा सुरळीतपणे सुरू आहेत. सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिक्षकांसाठी शाळेची वेळ असेल. विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंतच शाळा ठेवण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना आदेश दिले आहेत.

- भास्करराव बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

शाळा बंद होणार नाहीत

राज्यात ओमिक्रॉनचे दहा रुग्ण आढळले असून, त्यातील काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाची दुसरी लाट आटोक्‍यात आली असून राज्यातील बहुतेक गावे कोरोनामुक्‍त झाली आहेत. राज्यात सध्या साडेसहा हजारांपर्यंत ऍक्‍टिव्ह रुग्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता शाळा बंद होणार नाहीत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला प्राधान्य दिले जाईल, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT