Sculptures made the art of casting memories of relationship solapur sakal
सोलापूर

नात्याच्या आठवणी Casting कलेतून केल्या शिल्पबद्ध

पार्क चौकातील दिपाली माळगे यांची आगळी निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : रोजच्या आयुष्यातील अनेक क्षण कधी कॅमेरामध्ये चित्रबद्ध तर कधी सीडीमध्ये साठवलेले असतात. या क्षणाच्या स्मृती जपण्याच्या पारंपरिक माध्यमांसोबत चित्रे व शिल्पाद्वारेही स्मृती जपली जाते. पण ते अगदी कमी जणांना जमते. पण कास्टींग कलेच्या माध्यमातून बाळाचे हात, ज्याला वंदन करावेत असे पाय यासारख्या वेगळ्या कलात्मक निर्मितीमधून येथील दिपाली माळगे यांनी कलेचे नवे दालन उघडले आहे.

कोणत्याही घरात गेले की आपल्याला घरातील नातेवाईक व कुटुंबियांचे स्मृती जपणारे फोटो पहावयास मिळतात. क्वचित एखादे शिल्प पहायला मिळते. त्या पलिकडे आपल्याला वेगळ्या कलेच्या माध्यमातून आठवणींनी घराची सजावट जपता येईल याचा विचार सातत्याने दिपाली माळगे या करत होत्या. त्यांनी काही महिने सातत्याने याबाबत कलेसंदर्भात माहिती देणारी पुस्तके व संकेतस्थळांवर शोध चालवला होता.

काही महिन्यांच्यानंतर त्यांना कास्टींग कलेचा ठावठिकाणा लागला. शिल्प व म्युरल आर्टच्या जवळ असलेली ही कला आहे. त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतके लोक काम करतात. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा हात किंवा पायाचे ठसे जतन करून त्यावर आधारित शिल्पे तयार केली जाऊ शकतात असे आढळले. पण ही कला शिकविण्याचा प्रश्‍न अडचणीचा होता.

तेव्हा त्यांनी शोधाशोध केली व स्वतः शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुण्याला एका महिला कलावंताने या कलेचे शिक्षण दिले. त्यावरून त्यांनी कामास सुरवात केली. कोणत्याही व्यक्तीचा पंजा किंवा पाय विशिष्ट रसायनात बुडवून ठसे केले जातात. या ठशांच्या मदतीने त्याचे छोटेखानी शिल्प तयार केले जाऊ शकते. त्यांनी त्याला अधिक कलात्मक पध्दतीने तयार करण्यास सुरवात केले.

लहान बाळाचे व आईचे हात, बाळाचे पंजे आईच्या हातात असे काही शिल्प त्यांनी केले. तसेच फोटोला जोडून कलात्मक फ्रेम त्यांनी तयार करण्यास सुरवात केले. या प्रकारची शिल्पे घरातील स्मृती जपण्यासोबत ते घराला वेगळी शोभा आणतात. तसेच ते शिल्प म्हणूनदेखील देखणे ठरतात. त्यांच्या या कलेला आता प्रतिसाद मिळू लागला आहे.

  • हाताच्या व पायाच्या ठशावरून शिल्पाची निर्मिती

  • लहान बाळाच्या लहानपणाच्या आठवणी चिमुकल्या हाताच्या शिल्पातून जपणे शक्‍य

  • आई व बाळाच्या नात्यावर आधारित शिल्पे

  • विवाहाच्या प्रसंगांना शिल्पाचे रुप

  • शिल्प व फोटो फ्रेमची आकर्षक निर्मिती

काही संशोधन व मार्गदर्शनातून मी ही कला आत्मसात केली आहे. आता काही शिल्पे तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. पुढील काळात या निर्मितीला अधिक चांगले स्वरुप यावे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे.

- दिपाली संगमेश्‍वर माळगे, पार्क चौक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT