hotel photo.jpg 
सोलापूर

उडुपी, राजस्थानी, गुजराथी व नेपाळी आचाऱ्यांची हॉटेल चालकांकडून शोध मोहिम 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः शहरातील हॉटेल व्यवसायास मिळालेल्या परवानगीनंतर सुरुवात झाली आहे. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ बनवणारे उडूपी, गुजराथी व नेपाळी आचारी व कामगारांना परत कामावर आणण्याची धावाधाव सुरू झाली आहे. या क्षेत्रात अंदाजे दहा हजार कामगार आता पून्हा कामावर येणार आहेत. 

हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला कोरोना अनलॉकमध्ये बंद करण्यात आले होते. नंतरच्या काळात पार्सल सेवा सुरू करण्यात आली. मात्र त्यालाही कोरोना भीतीमूळे फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर महानगरपालिकेने हॉटेल व्यवसायास परवानगी दिली आहे. काही नियमांच्या बाबत संभ्रम असल्याने हॉटेल संघटना पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यामध्ये बार व परमिट रुमशी जोडलेले रेस्टॉरंटला परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार उर्वरीत हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल उघडली आहेत. 
हॉटेल उघडल्यानंतर ग्राहकांचा प्रतिसाद अगदीच कमी आहे. केवळ रस्त्यावर असलेली चहा दुकाने, फास्टफूड सेंटर या ठिकाणी मात्र गर्दी होत आहे. हॉटेलमध्ये जाऊन चहा व नाश्‍ता करणारे ग्राहक अत्यंत कमी आहेत. कोरोना संसर्गाच्या धास्तीने अद्याप त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. 

हॉटेलचा व्यवसाय सुरु झाला असला तरी सर्वात मोठा प्रश्‍न आचारी व कामगारांचा झाला आहे. साउथ इंडियन डिश तयार करणारे गुजराथी, उडूपी व नेपाळी आचारी गावाकडून परत कामावर आलेच नाहीत. तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या परप्रांतिय कामगाराची संख्या खुप मोठी आहे. यामध्ये प.बंगाल, राजस्थान अशा अनेक राज्यातील कामगार काम करतात. या प्रकारचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांची संख्या अडीच हजारापेक्षा अधिक आहे. काही हॉटेल चालकांनी या कामगार व आचाऱ्यांशी लॉकडाउनच्या काळात संपर्क व पगार कायम ठेवून ते पुन्हा कामावर येतील असा प्रयत्न केला. मात्र हे परप्रांतीय अद्याप परतले नाहीत. अनेक हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आता पून्हा येण्याच्या स्थितीत नाहीत. उत्तरभारतातील अनेक कामगारांनी दिल्ली व त्यांच्या मुळगावानजीकच्या शहरात कामावर जाण्यास सुरवात केली आहे. या कामगारांची उणीव भरुन काढण्यासाठी हॉटेल चालकांना इतर कामगारांचा शोध घ्यावा लागत आहे. 
हॉटेलिंगमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयसह एकूण दहा ते पंधरा हजार कामगार काम करतात. हॉटेल व्यवसाय सुरु झाल्याने अधिक कामगारांना काम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या लक्षणीय आहे. अजूनही पुरेसे ग्राहक हॉटेलात कोरोनाच्या भीतीपोटी येत नसल्याने ग्राहकी वाढण्यास अवधी लागणार आहे. तोपर्यंत कामगाराची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नियमित व्यवसायाला लागणार अवधी 
हॉटेल व्यवसाय सुरू झाले आहेत. मात्र ग्राहकांची संख्या कमी व परप्रांतीय आचाऱ्यांचा प्रश्‍न सुटण्यास आणखी काही महिन्याचा कालावधी लागू शकतो. 
- उदय भागवत, सेक्रेटरी, सोलापूर हॉटेल असोसिएशन,  सोलापूर.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT