dhaman.jpg
dhaman.jpg 
सोलापूर

सापांच्या आपसातील लढाया पाहून त्यांची भीतीने उडाली गाळण 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूरः पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील तीन भागात अचानक सापांची द्वंद युध्द व काही ठिकाणी तीन सापांची युध्दे पाहून प्रत्यक्षदर्शीच्या अंगावर काटा आला. सर्पमित्र व निसर्ग अभ्यासकांना बोलावून आणण्याची धावाधाव सूरू झाली. त्यानंतर हा प्रकार स्पष्टपणे कळाल्यानंतर या नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. 

मार्च ते जुलैच्या दरम्यान धामण सापांच्या मिलनाचा काळ चालू असतो. परंतु त्यासाठी मादीला आकर्षीत करण्यासाठी दोन तर काहीवेळेस तीन नरांना आपापसात द्वंद्व युद्ध करावे लागते. या द्वंद्व युद्धात एकमेकाला चावा न घेता फक्त आपल्या ताकदीने फक्त खाली पाडण्याचा प्रयत्न करतात. या युद्धामध्ये जो नर धामण जिंकेल तो त्या परिसरातील मादीबरोबर पुढची प्रजावळ वाढवतो. मादी धामण एका वेळेस 6 ते 14 अंडी घालून दूर निघून जाते. साधारण दोन महिन्यानंतर अंडीतून पिल्लं जन्माला येतात. 
बाळे येथे जुना बार्शी नाका परिसरातील अरतानी गोडावूनच्या समोर सकाळी 11:00 च्या दरम्यान तीन नरामध्ये द्वंद्व युद्ध चालू होते. नेचर कॉन्झरव्हेशन सर्कलचे संतोष धाकपाडे यांनी तिथल्या कामगारांना "हे साप आपल्याला कोणतेही इजा पोहचवीत नाही" हे ऐकल्यावर त्या कामगारांनी निश्‍वास सोडला. 

काही वेळानंतर अंबिका नगर, बाळे येथे सुद्धा मनुष्यवस्तीत दोन नर धामण सापांचे द्वंद्व युद्ध चालू होते. परंतु सुरेश क्षीरसागर यांनी अंबिका नगर येथे जाऊन तिथल्या नागरिकांना समजावून सांगितले. कुणाल दळवी यांनी सोमानंद डोके यांना फोनवरून माहिती दिली की आमच्या शेतात दोन साप आहेत. काही वेळातच निसर्गप्रेमी सोमानंद डोके तिथे पोहचले आणि पाहिलं असता कुणाल दळवी यांच्या शेतात देखील दोन धामण नराचे युद्ध चालू होते. डोके यांनी दळवी यांना हे साप निरुपद्रवी व बिनविषारी असल्याचे सांगितले. 
धामण हा एक चपळ साप आहे. तो पाण्यात जलद पोहू शकतो. पोहताना त्याचे डोके पाण्याच्या बाहेर असते. झाडावर चढण्यातही हा साप तरबेज आहे. त्याच्या मार्गात असलेल्या वस्तूला तो शेपटीने वेटोळे घालतो. त्यामुळे भक्ष्य पकडण्यास त्याला आधार मिळतो. पाली, पक्षी व इतर लहान पृष्ठवंशीय प्राणी हे त्याचे अन्न आहे. तसेच बेडूक, कासवाची लहान पिले, वटवाघळे व लहान साप तो खातो. त्याचे मुख्य भक्ष्य उंदीर आहे. शेतातील उंदीर फस्त करून तो पिकांचे नुकसान टाळतो व अशा रीतीने तो शेतकऱ्याचा मित्र ठरतो. 

धामण हा बिनविषारी साप 
धामण सापांची अशी नर सापांची युध्दे प्रजनन काळात दिसतात. मात्र हे साप बिनविषारी आहेत व उंदराचे भक्षक असल्याने शेतीसाठी उपयूक्त ठरतात.

-संतोष धाकपाडे,नेचर कॉन्झरव्हेशन सर्कल 

धामण मारणे चुकीचे 

धामण हा निरुपद्रवी साप असून त्यास गैरसमजाने मारणे चुकीचे ठरते. अनेक वेळा विषारी साप समजून मारण्याचे प्रकार करणे चुकीचे ठरते 

- सोमानंद डोके, निसर्गमित्र 

घाबरण्याचे कारण नाही

धामण साप हे झाडे व शेतांच्या परिसरात भक्ष्यांच्या शोधात वावरत असतात. माणसाला त्यांचा त्रास नसतो

- सुरेश क्षीरसागर  निसर्गमित्र 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT