Vetalwadi GP
Vetalwadi GP 
सोलापूर

वेताळवाडी गावविकासाच्या चाव्या उच्चशिक्षितांच्या हाती ! सरपंचपदी डॉक्‍टरेट महिला तर उपसरपंचपदी वकील 

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड बिनविरोध झाली आहे. या दोन्ही पदांवर उच्च शिक्षितांची वर्णी लागली असून, सरपंचपदी एमए एमएड्‌ पीएचडी झालेल्या डॉ. रजनी मगन सुरवसे तर उपसरपंचपदी ऍड. पांडुरंग खोत यांची बिनविरोध निवड झाली आहे. उच्च शिक्षितांच्या हातात गावविकासाच्या चाव्या दिल्याने संपूर्ण जिल्ह्यात वेताळवाडी ग्रामपंचायतीची चर्चा सुरू आहे. 

सुमारे सोळाशे लोकसंख्या व सुमारे साडेनऊशे मतदार असलेल्या माढा- कुर्डुवाडी रस्त्यालगत असलेल्या वेताळवाडी गावात रेल्वे खात्यात नोकरीस असणाऱ्यांचे प्रमाण चांगले आहे. तसे हा भाग अवर्षणग्रस्त आहे. ग्रामपंचायत निवडणूक लागल्यानंतर सर्व ग्रामस्थांनी चर्चा व विचारविनिमय करून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील सहा सदस्य बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश मिळाले. केवळ एका जागेसाठी निवडणूक लागली होती. गावाच्या विकासावर भर देत आपापसातील राजकीय मतभेद ग्रामस्थांनी दूर ठेवून निवडणूक बिनविरोध केली. 

सर्वसाधारण वर्गसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी डॉक्‍टरेट झालेल्या रजनी सुरवसे यांची तर उपसरपंचपद युवा वर्गाला देत ऍड. पांडुरंग खोत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उच्च शिक्षितांच्या या निवडीचा संपूर्ण राज्याने आदर्श घेण्याची गरज आहे. उच्च शिक्षित सरपंच व उपसरपंचांनी कोणतेही अभिनिवेश न ठेवता गावाचा विकास हाच एकमेव अजेंडा ठेवून काम करणार असल्याचे सांगितले. 

वेताळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडी : डॉ. रजनी सुरवसे (सरपंच), ऍड. पांडुरंग खोत (उपसरपंच), सदस्य : रतन सुरवसे, अश्विनी जाधव, सुनीता सुरवसे, राजाराम खोत, महेश पवार. 

या निवडी बिनविरोध होण्यासाठी किरण सुरवसे, राजेश पाटील, अमोल सुरवसे, प्राचार्य रवी सुरवसे, शिवाजी सुरवसे, बापू सुरवसे, रामदास राऊत, शहाजी सुरवसे, विष्णू सुरवसे, अंकुश भापकर, महेश जाधव, शरद सुरवसे, रामदास सुरवसे, सतीश खोत, दत्ता खोत, प्रवीण बारगुळे, नितीन खोत, संतोष पवार, मनोज गायकवाड, सोमनाथ बचुटे, राजेंद्र राऊत यांनी प्रयत्न केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT