lions club international.jpg
lions club international.jpg 
सोलापूर

लायन्स कल्ब ऑफ सोलापूर व्टिनसिटीच्या वतीने सेवा सप्ताह 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर ः येथील लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर व्टीन सिटीच्या वतीने ता.2 ऑक्‍टोबर ते 8 ऑक्‍टोंबर 2020 पर्यंत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अशी माहिती लायन्स क्‍लब ऑफ सोलापूर व्टिन सिटीचे अध्यक्ष डॉक्‍टर राहुल चंडक यांनी दिली. 

दिनांक 2 ऑक्‍टोंबर शुक्रवार रोजी रेल्वे स्टेशन येथील गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सप्ताहाची सुरवात होईल. तसेच सकाळी दहा वाजता चंडक मुनोत हॉस्पिटल येथे सकाळी 10 वाजता मोफत कान,नाक, घसा शिबिर तसेच मोफत स्त्री रोग तपासणी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहाचे उद्घघाटन सिद्धेश्वर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे व माजी प्रांतपाल डॉ. नारायणदास चंडक यांची उपस्थिती लाभणार आहे. 

शनिवारी (ता.3) सकाळी दहा वाजता मोफत मधुमेह, आणि रक्तगट तपासणी शिबिर नंदनवन वाचनालय विजापूर रोड आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शतकवीर रक्तदाते अण्णासाहेब कोतली व मल्लिनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. रविवारी (ता.4 ) सकाळी दहा वाजता मोफत अन्नदान वाटप शिबिर झाले. या कार्यक्रमास 
प्रमुख उपस्थिती आझमभाई शेख, झोन चेअरमन रकीब खान यांची प्रमुख उपस्थिती होती. सोमवारी (ता.5) रोजी सकाळी अकरा वाजता डॉ. कुमठेकर हॉस्पीटल कॅन्सर रिसर्च सेंटर विजापूर रोड येथे मोफत आरोग्य शिबीर व रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम होईल. या कार्यकमास डॉ. शिरीष कुमठेकर, चेअरमन डॉक्‍टर अभिजित जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मंगळवारी (ता.6) सकाळी 11 वाजता व्दारकानगरी शॉपिंग सेंटर व्हीजन रिसर्च सेंटरचे उद्घाघाटन आणि मोफत सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी प्रांतपाल डॉ.व्यंकटेश यजुर्वेदी आणि बाळासाहेब कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बुधवारी (ता.7) सकाळी 11 वाजता पाण्याची टाकी प्रदान साई व्हीजन इंग्लीश मिडीयम स्कूल आहेरवाडी ता. सोलापूर येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे हिराचंद धुळम, सुनंदा शेंडगे उपस्थित लाभणार आहे. गुरुवारी (ता.8) सकाळी आठ वाजता मोफत अन्नदान वाटप श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मोहन भूमकर, शैलेश कोरवार लाभणार आहेत. सप्ताहचे प्रमुख सोमशेखर भोगडे, सहप्रमुख हिराचंद धुळम, सागर पुकाळे यांनी केले आहे. 
या उपक्रमाचे आवाहन सचिव नागेश बुगडे यांनी केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT