Viral News Esakal
सोलापूर

Viral News: सत्तर फूट खोल विहीर अन् आईसह २७ पिल्लांना बाहेर काढण्याचा ४ तासाचा थरार

सत्तर फूट खोल विहिरीतून २७ पिलांसह मादी घोणस सापाला वाचविण्यात यश

सकाळ डिजिटल टीम

यत्नाळ (ता. दक्षिण सोलापूर) येथे वैजिनाथ तल्लीकर या शेतकऱ्याच्या ७० फूट खोल विहिरीतून एका मादी घोणस सापासह २७ पिलांना वाचविण्यात यश आले आहे.(Latest Marathi News)

ॲनिमल राहतचे भीमाशंकर विजापुरे यांचा यत्नाळ या गावातून वैजिनाथ तल्लीकर या शेतकऱ्याचा शनिवारी (ता.२४) सकाळी नऊ वाजता फोन आला व विहिरीमध्ये एक साप व त्याचे दोन तीन पिल्लं असल्याचे सांगितले. तत्काळ ॲनिमल राहतचे भीमाशंकर विजापुरे यांनी आपल्या वरिष्ठ डॉ अनिकेत नावकर यांना कळवले व डॉ. अनिकेत नावकर यांनी रेस्क्यू करण्यासाठी एक टीम तयार केली. (Latest Marathi News)

Viral Photo

त्यात ॲनिमल राहतचे डॉ अनिकेत नावकर व भीमाशंकर विजापुरे आणि वन्यजीवप्रेमी प्रवीण जेऊरे व तेजस म्हेत्रे या चौघांची टीम ॲनिमल राहतच्या रुग्णवाहिकेने यत्नाळ या गावात पोचलले. त्या ठिकाणी पोचल्यावर त्या विहिरीची पाहणी केली असता विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या व इतर काही पर्यायी रस्ता नव्हता व विहीर ही ७० ते ७५ फूट खोल होती. त्यामुळे रॅपलिंग किटच्या साह्याने प्रवीण जेऊरे हे प्रथमतः विहिरीत उतरले. त्यानंतर भीमाशंकर विजापुरे हे पण रॅपलिंग किटच्या साह्याने खाली उतरले. सर्वात अगोदर मादी घोणस सापाला पकडून एका पिशवीत तिला वरती सुरक्षित ठिकाणी पाठवून दिले व त्या नंतर त्या मादी घोणस सापाचे पिल्ले पकडून एका मोठ्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाकण्यात आले.(Latest Marathi News)

यामध्ये एकूण २७ जिवंत पिल्ले सापडले असून चार मृत पिल्ले सापडले आहेत. मादी घोणस सापाचे पिल्लांना छोट्या छोट्या दगडा खालून व पाण्यात शोधून काढून रेस्क्यू करण्यात आला. या रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुमारे चार तासाचा अवधी लागला. एक मादी घोणस व तिची २७ पिल्ले ७० फूट खोल विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात ॲनिमल राहत संस्थेला व वन्यजीवप्रेमीला यश आला. त्या नंतर त्या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT