वेळापूर (सोलापूर) : संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील जागेचा मोबदला हा नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर मोबदला जमा होताच लाभार्थ्यांनी विनाविलंब जमिनीचे हस्तांतरण करावे, असे आवाहन अकलूज उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी व्यक्त केले.
प्रांताधिकारी पवार या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील वेळापूर परिसरातील ९६५ या राष्ट्रीय महामार्गावरील संपादित करण्यात आलेल्या जमिनींची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी वेळापूर पत्रकारांना त्यांनी माहिती दिली. पवार पुढे म्हणाल्या, दोन्ही पालखी मार्गावरील संपादित जागा, जमिनीची संपूर्ण माहिती मोबदला मिळविण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती संबंधित गावचे तलाठी व सर्कल यांच्याकडे आहे. संबंधितांनी त्यांच्याकडे संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्याची सूचना केली.
पालखी मार्गात गेलेल्या जमिनी, इमारती, झाडे यांच्या नुकसान भरपाई वाटपाची प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडली जाते. त्यामध्ये तक्रार आल्यास या तक्रारीची सुनावणी घेवून निर्णय घेतला जातो. तक्रारीत तथ्य असल्यास ती सिध्द करण्याची जबाबदारी ही संबंधित तक्रारदाराची असते.
- वेळापुरात ७१ हेक्टर जमीन संपादित, ७० कोटी भरपाई.
- वेळापूर येथील संपादनातून वगळलेले गट क्र. १७८४,१७८६ , १७८७,१७८८,११११,११०६,११०८,१११२.
- मूल्यांकन- शेतजमीन १२२० रुपये, बिगरशेती जमीन (२०१७ पूर्वीची) १८९० रुपये प्रति चौमी .
- जमिनी, इमारती, झाडांचे मुल्यांकन बदलण्याचे अधिकार सक्षम लवादाकडे.
- दोन्ही पालखी मार्गासाठी १४० हेक्टर जमिनीचा ताबा, वाटप मोबदला ४७० कोटी.
- नातेपुते माळशिरसला बायपास, वेळापूरातून सुमारे दीड किलोमीटरचा उड्डाणपूल.
- धर्मपुरी दसुर शाळांच्या नुकसान भरपाईपोटी सव्वा चार कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग.
- घुले वस्ती, पानीव येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या विहिरीस संरक्षण, त्यासाठी सहा हेक्टर अतिरिक्त जमिनीचे संपादन.
वेळापुरात उड्डाणपूलच
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या धाव्यापासून सुरु होवून तो वेळापूर बसस्थानकाजवळ संपेल. पालखी चौकात साडेपाच मीटर उंच, तीस मीटर रुंदीचा उड्डाणपूल. दोन्ही बाजूने प्रत्येकी ७ मीटरचा सर्व्हिस रोड राहील. पालखी चौकात अकलूज सांगोला रस्ता उड्डाणपुलाखालून जाईल. एसटी स्टँडच्या पूर्वेकडील प्राचीन तलाव आणि हेमाडपंथी नाथ मंदिरालगतच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १०० मीटर परिसरात कोणतेही रस्त्याचे काम होणार नाही. भरपाई मिळताना होणारा विलंब टाळण्यासाठी सबळ शासकीय कागदपत्रे जमा करा, असे सांगून लाभार्थ्यांनी दलाल, एजंटापासून सावध राहा, असे आवाहन यावेळी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांनी केले. या पत्रकार परिषदेस वेळापूरचे तलाठी राघवेंद्र तोरके, कर्मचारी नवनाथ गेजगे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.