RAJUBAPU PATIL
RAJUBAPU PATIL 
सोलापूर

निष्ठावंत शिलेदार हरपला : शरद पवारांसह मान्यवरांनी केले राजूबापू पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

सुनील कोरके

भोसे (क) (सोलापूर) : कै. यशवंतभाऊ व त्यानंतर राजूबापू पाटील यांनी कायमच आमच्या विचाराशी एकनिष्ठ राहून राजकारण केले. आज त्यांच्या निधनाने एका निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष मुकला असून, राष्ट्रवादी कॉंगेस पक्ष व व्यक्तिशः पवार परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे. भविष्यात कायम आपल्यासोबत राहू, अशा भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राजूबापू पाटील यांचे चिरंजीव गणेश पाटील यांच्याशी फोनवरून व्यक्त करून धीर दिला. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्य राजूबापू पाटील यांचे नुकतेच निधन झाले, तसेच त्यांचे लहान बंधू व चुलते यांचेही निधन झाले असून, त्यांना मंत्री, लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून व ट्विट करून श्रद्धांजली वाहिली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले, राजूबापू पाटील यांचे निधन ही अतिशय धक्कादायक बातमी असून, जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारे विश्वासू नेते पक्षाने गमावले याचे अतीव दुःख होत आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील. 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, राजूबापू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. 

पक्ष प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, राजूबाप पाटील यांचे निधन ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना असून, आम्ही सर्वजण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. 

खासदार सुप्रिया म्हणाल्या, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. 

पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राजूबापू पाटील यांच्या निधनाने पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. अगदी दोन पिढ्या पवार यांच्या विचाराशी बांधील राहून राजकारण करणारे निष्ठावान व विश्वासू सहकारी हरपले. 

पंढरपूर-मंगळवेढाचे आमदार भारत भालके म्हणाले, अतिशय मनमिळावू, संघटन कौशल्य असणारे, शरीराने व मनाने मजबूत असणारा माणूस, दुसऱ्याविषयी कायम हित चिंतणारा व परिणामांची तमा न बाळगता स्पष्ट बोलणारा सहकारी आम्ही गमावला असून, भविष्यात बापूंच्या विचाराचे काम सर्वांनी मिळून करूया, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. 

भाजपचे विधानसभा सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील म्हणाले, सांप्रदायिक व राजकीय वारसा उत्तमरीत्या चालविलेले राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष व आमचे सच्चे मित्र राजूबापू पाटील यांचे निधन झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार म्हणाले, राजूबापू पाटील यांच्या निधनाने फार मोठा धक्का बसला. पाटील कुटुंबावरील हा मोठा आघात असून, संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवार त्यांच्या दुःखात सहभागी आहे. 

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील म्हणाले, आपल्याला खूप काही करायचे होते, मात्र आपण अर्ध्यावरती सोडून गेलात. एक सच्चा मित्र ज्याने कशाचीही अपेक्षा न करता आपलं पूर्ण आयुष्य साहेबांसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. 

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍यराणा पाटील म्हणाले, एक उत्तम मार्गदर्शक, निष्ठावंत व्यक्तिमत्त्व, चांगल्या- वाईट क्षणांचा कधीही विचार न करणारा एक सच्चा सहृदयी माणूस हरपला. 

संदीप वर्पे, कार्याध्यक्ष-राष्ट्रवादी कॉंग्रेस, अहमदनगर, मेंढापूर, रोपळे, शेवते यासह सर्वच ग्रामपंचायतींच्या वतीने राजूबापू पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT