अण्णा दावल ती दिशा 'पूर्व', तरीबी कात्रजच्या घाटाची भीती!
अण्णा दावल ती दिशा 'पूर्व', तरीबी कात्रजच्या घाटाची भीती! 
सोलापूर

अण्णा दावल ती दिशा 'पूर्व', तरीबी कात्रजच्या घाटाची भीती!

सकाळ वृत्तसेवा

अजूकबी अधिकृत पक्ष परवेश झालेला नाय, तरीबी महेशअण्णाच्या खांद्यावर त्येंनी राष्ट्रवादीची जबाबदारी दिलीया...

आगामी महापालिका निवडणुकीमुळं सोलापुरात (Solapur) बड्या-बड्या नेत्यांचे पाय लागू लागलेती... गेल्यायेळी 102 जागांवर उमेदवार मिळालं नव्हतं... म्हनूनशान राष्ट्रवादीकडनं (NCP) यंदा लईच जोरात तयारी सुरु हाय...! मोठ्या सायबांनी लक्ष घातलं हाय... त्यांनी सोलापूरच्या नेत्यांबरुबरच्या 'बैठकांवर जोर' लावला हाय... अजूकबी अधिकृत पक्ष परवेश झालेला नाय, तरीबी महेशअण्णाच्या खांद्यावर त्येंनी राष्ट्रवादीची जबाबदारी दिलीया... सेना (Shivsena) अन्‌ कॉंग्रेस (Congress) आली तर सोबत नायतर स्वबळावरचा नाराबी लावलाय..!

एकिकडं राज्यात सत्तेत सहभागीत असलेल्या महाईकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेनेत असलेल्या महेशअण्णाची घुसमट होऊ लागली. गेल्या वक्ताला आपल्या ताकदीवर त्येंनी शिवसेनेचे नगरसेवक वाढविले. तरीपन पक्षाला त्येंची महतीच समजली नाय... त्या बरडेसायबाचाच वरचस्मा राहिला... काम आपण करायचं अन्‌ क्रेडीट दुसरा घेणार असं दिसल्यावर अण्णानं थेट थोरल्या सायबाकडं धाव घेतली... अनेक वाऱ्या झाल्या... पन शिंदे सायबाचं तसंच उद्धोसायबाचं मोठ्या सायबाशी असलेलं घट्ट नातं यामुळं महेशअण्णाची गोचीच झाली... 2009च्या इधानसभा विलेक्‍शनमधी शहर मध्यमधून ताईइरोधात सेनेनं उमेदवार दिला व्हता... तवा उद्धोसायब परचाराला येणार हुते... पण ऐनयेळी त्यांचा दौरा रद्द झाला. शिंदेसायब मुख्यमंत्री झाल्यावर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून तर त्येंच्या इरोधात सेनेनं उमेदवारच दिला नवता... दोन पिढ्या गेल्या पन हे सगळं राजकारण समजलंच नाय... वरच्या पातळीवर सगळी ऍडजस्टमेंट करत्यात म्हनं... अन्‌ कारयकर्त्यांचं मातुर मरण हुतं... हाणामारी अन्‌ गुन्हे दाखल हुताना ते सामान्य कारयकर्त्यावरच हुत असत्यात... हा आतापतूरचा अनुभव म्हनून सांगतुया..!

पूर्वी शिंदेसायबांबरुबर असताना कॉंग्रेसमदी असलेल्या महेशअण्णानं सेनेत परवेश केला... नंतर सेनेनं 2019ला इधानसभेचं दिलीपमालकाला तिकीट दिल्यावर अण्णा लईच नाराज झाला... सेनेनं म्हंजी त्या तानाजीसरानं कात्रजचा घाट दाखविल्यामुळं अण्णा शहर मध्यमदी ताईच्या इरोधात हुभं राहिलं... तसं तर अण्णाला शहर उत्तर सोप्प हुतं... पण ते विजूमालकबी लई डेंजर राजकारणी... त्येंनीबी बरुबर खेळी केली... हे राजकारणबी तुमास्नी कळणार नाय... अण्णाला शहर मध्यमदून लढवलं तर दिलीपमालक अडचणीत येणार ही आपल्या सायबाचीच खेळी हुती, ही आतल्या गोटातील खेळी हाय ! हे सगळं झाल्यावर आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचं अण्णाला समजलं...

अण्णाचा परवेश झाला काय अन्‌ नाय झाला काय? त्ये मनानं आता राष्ट्रवादीतच हायती... परवा मोठ्ठ सायब सोलापुरात आल्यावर अण्णाकडं जेवायला हुते... तवा इळ्याभोपळ्याचं सख्य असलेलं सपाटेसायब, दिलीपभाऊ यांच्यासारखे निष्ठावंत "राधाश्री'च्या भायर ताटकळत हुभं हुतं... आता या निष्ठावंतांना महेशअण्णा दावल ती दिशा "पूर्व' म्हणावी लागणार हाय... फुढचं महापालिकेचं विलेक्‍शन स्वतःच्या हिमतीवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्याचं ठरवलं हाय... अण्णा सेनेत असताना तिथल्या नेत्यांनी पायात साप सोडलं हुतं... आता राष्ट्रवादीतील लईच इरसाल असलेलं निष्ठावंत अण्णाला पचवतात की ते बी "कात्रजचा घाट' दाखवतात हे बघावं लागंल... मोठ्या सायबांनी सोलापुरात येऊन तर सगळी सूत्र हलविली असली तरी स्थानिक पातळीवर काय हुतंय ते बघावं लागणार हाय..!

- थोरले आबासाहेब

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT