Pawar_Shinde.
Pawar_Shinde. 
सोलापूर

शरद पवार म्हणाले, शेतकरी आंदोलनातून केंद्र सरकार नक्कीच धडा घेईल ! 

संतोष सिरसट

उत्तर सोलापूर : दिल्लीच्या जवळ मागील अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचं कानावर येत आहे; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही. या शेतकरी आंदोलनातून केंद्र सरकार नक्कीच धडा घेईल, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. 

नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे कृषिभूषण दत्तात्रेय काळे यांनी विकसित केलेल्या द्राक्षाच्या किंगबेरी या नव्या वाणाचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, आमदार बबनराव शिंदे, यशवंत माने, सुभाष देशमुख, रवींद्र बाबर, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, प्रदीप गारटकर, उमेश परिचारक, कृषिभूषण दत्तात्रेय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, नान्नजमध्ये आल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. नान्नजकरांनी शेती क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम केले आहेत. कमी पाण्याची पिके घेण्याचा प्रयत्न ते करत आहेत. भविष्यात शेतकऱ्यांनी शेतीमध्ये नवे विज्ञान, तंत्रज्ञान आणणे आवश्‍यक आहे. त्या माध्यमातून ज्यादा उत्पादन घ्यावे. शेती सुधारण्यासाठी विज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. शेतकऱ्यांच्या तंत्रज्ञानातूनच नवनवीन वाणांचा जन्म झाल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले. 

श्री. पवार पुढे म्हणाले (कै.) नानासाहेब काळे यांच्यानंतर त्यांचे पुत्र दत्तात्रेय काळे यांनी शेतीमध्ये आधुनिकता आणली आहे. शेतीमध्ये बदल, नावीन्य, दर्जा, जमिनीचा पोत सुधारणे, कमी पाण्यात शेती करणे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे आणि नान्नज हे त्याचे केंद्र झाले आहे. नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनी यातून शिकण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी, पवारांनी मला शेतीचे वेड लावले आहे. आज माझ्याकडेही द्राक्षाची बाग आहे. पण सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. 

प्रास्ताविकात दत्तात्रेय काळे यांनी एकूणच वाटचालीबद्दल माहिती विशद केली. 

पवार मनात घेतल्यावर कार्यक्रम करतात 
शरद पवार यांनी एखादी गोष्ट आपल्या मनात घेतल्यानंतर त्याचा ते बरोबर कार्यक्रम करतात, असे मत श्री. शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मी आज जो काही आहे तो केवळ पवारांमुळेच असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

80 कंपन्यांनी बुडवले शेतकऱ्यांचे पैसे 
द्राक्ष उत्पादने निर्यात करणाऱ्या जवळपास 80 कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. त्या कंपन्यांची यादी माझ्याकडे आली आहे. याबाबत एक-दोन दिवसांत दिल्लीमध्ये जाऊन संबंधित कंपन्यांना धडा शिकवणार असल्याचे या वेळी श्री. पवार यांनी सांगितले. 

देशमुखांचा नमस्कार अन्‌ पवारांचे हस्तांदोलन 
व्यासपीठावर आल्यानंतर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी श्री. पवार यांना नमस्कार केला. त्याच वेळी श्री. पवार यांनी हसतमुखाने सुभाष देशमुख यांच्याशी हस्तांदोलन केले. एकेकाळी एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दोन प्रतिस्पर्धी एकमेकांशी हितगुज साधत असल्याचे या वेळी दिसून आले. 

पवारांनी भरवली शिंदेंना द्राक्षं 
किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आपल्या हातातील द्राक्ष घडाचा एक मणी तोडून श्री. पवार यांनी श्री. शिंदे यांच्या मुखामध्ये घातला. त्याच वेळी श्री. शिंदे यांनीही पवारांना द्राक्षमणी भरवला. या वेळी उपस्थितांमध्ये कुतूहल निर्माण झाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT