Sharad Pawar Resigns as ncp chief supriya sule ajit pawar solapur politics esakal
सोलापूर

Sharad Pawar Resigns : पवारांनी पक्षध्यक्ष पद सोडताच मंगळवेढ्यात नाराजीचा सूर

शरद पवार राज्याच्या राज्यकारणामध्ये आल्यापासून त्यांचा मंगळवेढ्याशी चांगला संबंध होता

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाध्यक्ष पद सोडण्याच्या बाबत घेतलेल्या निर्णयामुळे मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवत आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली.

शरद पवार राज्याच्या राज्यकारणामध्ये आल्यापासून त्यांचा मंगळवेढ्याशी चांगला संबंध होता मंगळवेढ्यातील जनतेला सातत्याने नावानिशी ओळखत होते व तालुक्यातील इतर नेत्यांच्या हालचालीबरोबर त्यांच्या घरगुती माहिती घेऊन तालुक्याची खडान खडा माहिती घेण्यात आघाडीवर होते त्यामुळे एक काळ पवार बोले आणि मंगळवेढा आले अशी परिस्थिती होते.

तालुक्याच्या राजकारणातील स्व. कि.रा मर्दा स्व. रतनचंद शहा व माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे या तिघांनाही आपल्या सोबत ठेवण्यात यशस्वी ठरले.या तिन्ही नेत्यांच्या शब्दाला पवार साहेबाजवळ किंमत होती.त्यांना शेती, अर्थकारण राजकारण, समाजकारण, सर्व घटकाशी परिस्थिती रुप राजकारण करण्यामध्ये शरद पवार हे आघाडीवर राहिल्यामुळे त्यांच्याविषयी सर्वांच्या मनामध्ये एक आदराचे स्थान राहिले.

त्यानंतर स्व. भारत भालके हे तीन विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या पक्षातून लढले मात्र सातत्याने पवारांच्या संपर्कात राहिले स्थानिक राष्ट्रवादीमध्ये अनेक वेळा धुस्पून होत होते मात्र त्या धुसफूसीवर पवारांची मात्रा लागू होत असे मात्र पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय नुकताच त्यांनी घेतला परंतु त्याची सुरुवात स्वतःपासून करतील याची कल्पना कोणालाही नव्हती त्यांनी आज पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केले.

भगीरथ भालके म्हणाले की शरद पवार हे सर्व तरुणाईचे प्रेरणास्त्रोत आहेत त्यामुळे एवढ्या लवकर त्यांनी पद सोडवणे सध्याची राज्य व देशपातळीवर राजकीय परिस्थिती पाहता पवारांसारख्या मार्गदर्शक व आधाराची गरज आहे.

ओबीसी सेलचे प्रवक्ते लतीफ तांबोळी म्हणाले की सध्या राज्य आणि देश मोठ्या अडचणीतून सामोरे जावून हुकूमशाही कडे वाटचाल होत असलेल्या देशाला फक्त पवारच रोखू शकतात. सध्या त्यांचे वय झाले असले तरी दुर्धर आजारावर मात करणारे पवार साहेब हेच देशाची परिस्थिती बदलू शकतात ते सात ते रात्री बारा पर्यंत कामाचा कंटाळा न करणारे पवार साहेब अध्यक्ष सोडण्याचा घेतल्याने चुकीचा असून ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यास आम्हाला राजकारण करण्याची इच्छा राहणार नाही

राष्ट्रवादीचे राहुल शहा म्हणाले की शरद पवाराच्या प्रतिभा आणि विचारधारेपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही वय आणि तब्येत पाहता अध्यक्षपद सोडण्याची भूमिका ही पवार साहेबांनी स्वतःहून घेतली कदाचित त्यांच्या दृष्टीने ती योग्य भूमिका असेल त्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष स्वाभाविक आहे. माजी नगरसेवक अजित जगताप म्हणाले की, सध्या राजकीय परिस्थिती अडचणीची असल्याने 2024 पर्यंत महाविकास आघाडी स्थापन होईपर्यंत पवार साहेबांनी पद सोडायला नको आहे वय आणि प्रकृतीचा प्रकृतीचा विचार करून त्यांनी घेतलेले निर्णय योग्य असला तरी पक्षासाठी अजून काही दिवस त्यांनी थांबायला हवे होते.

राष्ट्रवादी पहिल्या थेट नगराध्यक्ष झालेल्या अरुणा माळी म्हणाल्या की केवळ पवार साहेबांच्या विश्वासावर पक्षात अनेक कार्यकर्ते जीव तोडून काम करतात त्यांनी त्यांच्यासारखे कार्य कुशल नेतृत्व दुसरे कोणतेही नाही सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी ची जबाबदारी सोडू नये वयाचा विचार करता त्यांनी कार्याध्यक्ष पदाची निर्मिती करून त्याच्यावर जबाबदारी सोपवावी.

तरी देखील ते त्यांच्या निर्णयावर ठाम असतील तर आम्ही राजकारणापासून दूर जाऊ माजी शहराध्यक्ष मुजमिल काझी म्हणाले की पवार साहेबांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याचा घेतल्याने हा धक्कादायक ठरला आहे आमच्यासाठी पवार साहेब हे ऊर्जास्रोत होते त्यांनी घेतल्याने मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने असंख्य पत्रे त्यांना पाठविण्यात येणार आहेत त्यांनी त्यांचा निर्णय सध्याची राजकीय परिस्थिती पाहता बदलावा ही विनंती करणार आहे. राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल यांनी देखील पवारांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा या मागणीसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT