Goat meal 
सोलापूर

और हड्डी गले में फंस गई..! बोकडाच्या जेवणामुळे उघडकीस आली कैदी, पोलिस, गावकरी आणि कोरोनाची धक्कादायक कहाणी !

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : बोकडाच्या जेवणासाठी खुनाच्या आरोपातील कैदी पोलिसांसह घरी येऊन जेऊन गेला. दुसऱ्या दिवशी संबंधित कैद्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे बोकडाच्या जेवणासाठी गेलेले अनेकजण अस्वस्थ झाले असून, जणू "हड्डी गले में फंस गई...' अशी त्यांची अवस्था झाली आहे. अनेकांनी स्वतःहून घरात क्वारंटाइन करून घेतले आहे. कोरोनामुळे उघड झालेल्या या प्रकाराची मंगळवेढा पोलिस चौकशी करत आहेत. 

बोकड, खुनातील आरोपी, पोलिस, गावकरी आणि कोरोना या धक्कादायक घटनेची समजलेली माहिती अशी, की पंढरपूर तालुक्‍यातील आंबे गावातील एका कुटुंबाच्या घरी शुक्रवारी बोकडाच्या जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कुटुंबाशी संबंधित एक व्यक्ती सध्या खुनाच्या प्रकरणात मंगळवेढा येथील सब जेलमध्ये आहे. बोकडाच्या जेवणासाठी आंबे येथे जाण्याचा प्लॅन त्या कैद्याने केला. पोलिसालाही बोकडाच्या जेवणाचा मोह आवरला नाही. संबंधित पोलिस त्या कैद्याला घेऊन खास गाडीने आंबे येथे आले होते. जेवणासाठी शंभराच्या आसपास लोकांनी उत्साहाने हजेरी लावली. उपस्थित मंडळी बोकड खाऊन तृप्त होऊन आपापल्या घरी गेली अन्‌ दुसऱ्या दिवशी (शनिवारी) मंगळवेढा येथून जेवणासाठी आलेल्या कैद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची चर्चा सुरू झाली आणि या प्रकाराची चर्चा चव्हाट्यावर आली. 

मंगळवेढावरून कैद्याला घेऊन पोलिस आंबे येथे कसे आले, याची चौकशी मंगळवेढा पोलिसांनी सुरू केली आहे. संबंधित कैद्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी म्हणून त्याला मंगळवेढा सब जेलमधून बाहेर काढल्याचा बहाणा करण्यात आला होता, अशी माहिती पुढे येत आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु बोकडाच्या जेवणासाठी गेलेले गावकरी मात्र कोरोनाच्या भीतीने धास्तावले आहेत. "और हड्डी गले में फंस गई' अशीच अवस्था बोकडाच्या जेवणावर ताव मारलेल्या लोकांची झाली आहे. 

या प्रकाराविषयी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण अवचर यांना विचारले असता ते म्हणाले, या घटनेची माहिती मंगळवेढा पोलिसांना कळविण्यात आली असून, मंगळवेढा पोलिस पुढील चौकशी करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT