AANDOLAN.png 
सोलापूर

धक्कादायकः कोविड केअर सेंटर उभारणीला विरोध करण्यासाठी 'या' गावचे ग्रामस्थ उतरले रस्त्यावरः वाचा सविस्तर 

श्रीकांत मेलगे

मरवडे(सोलापूर) : बालाजीनगर (ता. मंगळवेढा) येथे होत असलेल्या कोविड केअर सेंटरला ग्रामस्थांनी रस्त्यावर येत विरोध दर्शविला. ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेऊन कोविड केअर सेंटर अन्य ठिकाणी उभारण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

मंगळवेढा तालुक्‍यात 11 ठिकाणी अतिरिक्त कोविड केअर सेंटर निर्माण करण्यासाठी ठिकाणे अधिगृहित करण्याचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. या आदेशानुसार तालुक्‍यात आश्रमशाळा बालाजीनगर, उद्योग प्रशिक्षण केंद्र (नागणेवाडी), आयटीआय महाविद्यालय, वीरशैव व श्रीराम मंगल कार्यालय, श्रीराज मल्टिपर्पज हॉल, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, आयआरडीए इमारत, पार्वतीबाई ताड महाविद्यालय, ज्ञानदीप हायस्कुल, न्यू इंग्लिश हायस्कूल व महाविद्यालय या ठिकाणी ही अतिरिक्त कोविड केअर सेंटर होणार आहेत. 
बालाजीनगर येथे कोविड केअर सेंटर होणार असल्याचे समजताच ग्रामस्थांनी पंढरपूर-विजयपूर महामार्गावर बालाजीनगर फाटा येथे ठिय्या आंदोलन केले. 

आज दुपारी चारच्या सुमारास या मार्गावरील वाहतूकही नागरिकांनी बंद करत शासनाच्या आदेशाला विरोध दर्शविला. यावेळी बालाजीनगर येथील ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालाजीनगर आश्रमशाळा गावापासून अवघ्या तीनशे मीटर अंतरावर आहे. गावात पाणीपुरवठ्याची मोठी अडचण असल्याने गावातील बहुतांश नागरिक पाण्यासाठी आश्रमशाळेत जातात. आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर झाल्यास बालाजीनगर येथील ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होऊ शकतात या बाबींचा विचार करून सेंटरची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी ग्रामस्थांमधून करण्यात आली. आंदोलन सायंकाळी सहा वाजता रीतसर मार्गाने शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवित आंदोलन स्थगित करण्यात आले.  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT