श्रावण विशेष : भाविकांचे अढळ श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर
श्रावण विशेष : भाविकांचे अढळ श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर Canva
सोलापूर

श्रावण विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान श्रीक्षेत्र नीलकंठेश्वर मंदिर

बाबासाहेब शिंदे

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. त्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात असतात.

पांगरी (सोलापूर) : मराठवाड्याचे (Marathwada) प्रवेशद्वार असलेल्या पांगरी (ता. बार्शी) (Barshi) गावापासून दोन किलोमीटर असलेल्या बालाघाट पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिर (Neelkantheshwar Temole) हे भाविकांचे अढळ श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागलेली असते. त्यात महिला भाविक मोठ्या प्रमाणात असतात. पहाटे चार वाजल्यापासून मंदिरात महापूजा, अभिषेक, मंत्रोच्चाराने परिसर दुमदुमून जाऊन वातावरण भक्तिमय बनते. सध्याच्या लॉकडाउनच्या (Lockdown) काळात मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच मूर्तीचे दर्शन घ्यावे लागत आहे.

चिंचोली (ता. बार्शी) गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिराचे हेमाडपंती बांधकाम असून, गेल्या 45 वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून राजस्थानी कलाकारांकडून अखंड शिलांनी मंदिर बनवून सुबक कलाकृती बनविली आहे. त्यानंतर मागील पाच वर्षांपूर्वी मंदिराचे दक्षिण प्रवेशद्वार व पायऱ्या धोकादायक झाल्याने नव्याने बांधकाम करण्यात आले आहे. हे मंदिर पुणे-लातूर रस्त्यालगत असल्याने भाविकांना सहजासहजी दर्शन घडत असते. लॉकडाउनच्या काळात मंदिर बंद झाले तरी पायरीचे दर्शन घेऊन भाविक समाधान मानत असतात. मंदिराच्या समोरील बाजूस सभामंडप असून यामध्ये श्रावण महिनाभरात महिलांकडून पूजा केली जाते.

या मंदिराबाबत आख्यायिका सांगितली जाते. पूर्वी हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जात होता. प्रभू रामचंद्र सीतामाईच्या शोधार्थ या दंडकारण्यात दाखल झाल्यानंतर त्यांना शिवलिंग पूजेची इच्छा निर्माण झाली. त्या वेळी जमिनीतून शिवलिंग प्रगटले व त्याची त्यांनी पूजा केली. तेव्हापासून भाविकांचे नीलकंठेश्वर मंदिर श्रद्धास्थान बनले आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्वयंभू मंदिराच्या परिसरात विकास साधला आहे. यात यात्री निवास, वाहनतळ, सभामंडप, स्वच्छतागृहे, मंदिराच्या चोहोबाजूंनी ओवऱ्या व तटबंदी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर उत्तर बाजूस झाडांनी वेढलेला डोंगर असल्याने एक निसर्गरम्य स्थळ अनुभवता येते. मंदिराची स्वच्छता, नित्यनियमाने पूजा व देखभाल नीलेश गुरव, दत्ता गुरव, गणेश गुरव, प्रीतम गुरव, सुनील गुरव हे करतात.

मंदिराचे जतन व संवर्धन आवश्‍यक

श्रावण महिन्यात पहाटेपासून पूजा व धार्मिक विधी सुरू असतात. गुढीपाडवा, महाशिवरात्री, पौर्णिमेला कीर्तन व भजनाचे कार्यक्रम होत असतात. मंदिराच्या दक्षिण बाजूच्या जुनाट दगडी ओवऱ्या धोकादायक झाल्या आहेत, त्यांचे जतन व संवर्धन व्हावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

जवळची पर्यटन स्थळे...

  • रामलिंग : येडशीजवळ रामलिंग येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. येथे धबधबा व अभयारण्य असून निसर्गरम्य ठिकाण आहे.

  • चुंब कोरेगाव : येथील यमाई मंदिर, ब्रिटिशकालीन तलाव व बालाघाटची सुंदर डोंगररांग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! ED अन् इतर तपास यंत्रणांना चपराक, काय दिला निर्णय?

Medicine Rate: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 41 औषधांच्या किमती होणार कमी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Air India : टॉयलेटमध्ये बसला, टिश्यू पेपरवर लिहिलं 'बॉम्ब', एअर इंडियाच्या विमानात खळबळ

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Healthy Diet: ‘पावडर प्रथिनां’च्या अतिसेवनामुळे शरीराला धोका; खेळाडूंना डॉक्टरांचा सल्ला

SCROLL FOR NEXT