श्रावण विशेष : निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी
श्रावण विशेष : निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी Canva
सोलापूर

श्रावण विशेष : अध्यात्माची अनुभूती देणारी चिंचगाव टेकडी !

विजयकुमार कन्हेरे

नयनरम्य निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माची अनुभूती घेण्यासाठी माढा तालुक्‍यातील चिंचगाव टेकडी परिसराला पर्यटकांकडून प्रथम पसंती दिली जाते.

कुर्डुवाडी (सोलापूर) : नयनरम्य निसर्गाच्या (Beautiful nature) सान्निध्यात अध्यात्माची (Spirituality) अनुभूती घेण्यासाठी माढा तालुक्‍यातील (Madha Taluka, Solapur) चिंचगाव टेकडी (Chinchgaon Tekadi) परिसराला भाविकांकडून व पर्यटकांकडून प्रथम पसंती दिली जात आहे. याशिवाय तालुक्‍यातील इतर सुप्रसिद्ध धार्मिक ठिकाणे, ऐतिहासिक किल्ला, उजनी धरण (Ujani Dam) व स्पेशल खाण्याचे पदार्थ पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात.

कुर्डुवाडी शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगाव टेकडी येथे सुमारे 60 वर्षांपूर्वी रामानंद सरस्वती महाराज वास्तव्यास आले. त्या ठिकाणी त्यांनी श्री महादेवाचे भव्य मंदिर व सभामंडपाची उभारणी केली. मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री गणेश, श्री विठ्ठल व श्री दत्त यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना केली. श्री विठ्ठलाच्या मूर्तीसमोर असलेल्या महादेवाच्या पिंडीकडे पाहिल्यानंतर भाविकांना अध्यात्माची वेगळी अनुभूती मिळते. येथील ध्यानमंदिरात ध्यानधारणा करून भाविक आंतरिक ऊर्जा मिळवतात. मंदिराच्या शिखरावर आकर्षक असे कोरीव काम केले आहे. शिखर, भव्य सभामंडपातील खांब, अनेक ठिकाणी केलेली कलाकुसर कलासक्त व्यक्तीला पाहण्यास थांबवून ठेवते. दर पौर्णिमेला हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते. कोरोनाचा काळ वगळता वर्षभर भाविक या ठिकाणी येतात. मोफत आरोग्य शिबिरे, संतांच्या जयंती, पुण्यतिथींचे आयोजन केले जाते. श्रावण महिन्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील भाविकांसह पंचक्रोशीतील लाखो भाविक या ठिकाणी येतात. रामानंद सरस्वती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली येथे सत्संग मंडळ, दल आदी सतत या कार्यक्रमासाठी तत्पर व कार्यरत असतात. ब तीर्थक्षेत्र असलेल्या या चिंचगाव टेकडी येथे राहण्यासाठी भव्य भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. निसर्गाच्या नवलाईने नटलेल्या या झाडांची उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी ठिबकची सोय देखील करण्यात आली आहे.

चिंचगाव टेकडीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या माढा येथे ऐतिहासिक श्री माढेश्वरी देवीच्या मंदिरात व कसबा पेठेतील श्री विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी असते. माढ्यातील ऐतिहासिक किल्लाही पर्यटकांना खुणावतो. चिंचगाव टेकडीपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर लऊळ येथे संत श्री कूर्मदास मंदिर आहे. तालुक्‍यात जवळच अरण येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संतशिरोमणी सावता महाराज यांचे मंदिर आहे. ऊस, केळी व डाळिंबाचे क्षेत्र जास्त असलेल्या या परिसरात गुऱ्हाळेही आहेत. कृषी पर्यटनासाठी देखील येथे वाव आहे. या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील काही हॉटेल्समध्ये पर्यटक मेजवानी घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत. परिसरात आल्यानंतर खवय्ये बाजार आमटी, शेवगा शेंगाची आमटी, कंदी पेढे खाल्ल्याशिवाय राहात नाहीत.

तालुक्‍यातील आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे उजनी धरण होय. ठराविक काळात येणारे फ्लेमिंगो पक्षी, बॅकवॉटर, वीजनिर्मिती प्रकल्प आदी सर्वच पर्यटकांना आकर्षित करतात. तालुक्‍यातील सुमारे 22 किलोमीटर लांबीचा भीमा-सीना जोड कालवा, माढा वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले बेंद ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण पाहण्यासाठी अनेकजण येतात. एकंदरीत चिंचगाव टेकडी येथील हिरव्या निसर्गातील वातावरणात अध्यात्माची अनुभूती घेऊन तालुक्‍यातील इतर धार्मिक, ऐतिहासिक स्थळांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

पाहण्यासारखी ठिकाणे

  • माढा येथील श्री विठ्ठल मंदिर, ऐतिहासिक श्री माढेश्वरी मंदिर, ऐतिहासिक किल्ला

  • अरण येथील संत शिरोमणी सावता महाराज यांचे मंदिर

  • लऊळ येथील संत श्री कूर्मदास मंदिर

  • उजनी येथील धरण, बॅकवॉटर, बोटिंग, फ्लेमिंगो पक्षी

कसे येणार?

  • कुर्डुवाडी रेल्वे जंक्‍शनपासून चिंचगाव टेकडी अंतर सात किलोमीटर

  • कुर्डुवाडीतून बसेसवेची सुविधा, स्वतःच्या वाहनातून चिंचगाव टेकडी येथे येता येते

  • खवय्यांची मागणी असलेले स्पेशल खाद्यपदार्थ - बाजार आमटी, शेवगाशेंग आमटी, कंदी पेढे

चिंचगाव टेकडी मंदिर येथे भाविकांना राहण्यासाठी व महाप्रसादासाठी उत्तम सोय आहे. कोरोनाच्या काळात सध्या मंदिर बंद आहे पण इतर कालावधीत लाखो भाविक इथे दर्शनासाठी येतात. येथून जवळ असलेल्या इतर गावांतील धार्मिक स्थळांना जाता येते.

- ज्योतिबा उबाळे, विश्वस्त, महादेव मंदिर सत्संग आश्रम, चिंचगाव

येथे आल्यानंतर चिंचगाव टेकडी येथे कुटुंबासह श्री महादेव मंदिर, रामानंद सरस्वती महाराजांचे आशीर्वाद घेऊन उजनी धरणावर छान फेरफटका मारतो. माढा येथील श्री माढेश्वरी मंदिरात जातो.

- सतीश गायकवाड, इंजिनिअर, रा. कुर्डुवाडी, सध्या रा. गुलबर्गा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT