solapur sakal
सोलापूर

श्री गजानन महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत शाही सोहळा पाहून फिटले डोळ्यांचे पारणे

आज उपलप मंगल कार्यालयात मुक्काम

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आज (रविवारी) सोलापूर शहरात आगमन झाले. महापालिकेच्या वतीने आज रूपाभवानी मंदिर येथे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी पालखीचे सपत्नीक पूजन करून स्वागत केले. रूपाभवानी ते प्रभाकर महाराज मंदिर या मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती.

यावेळी पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर, नगर अभियंता संदीप कारंजे, अग्निशमन दलाचे अधिकारी केदार आवटे, माजी सभागृहनेते संजय कोळी, राजू पाटील, माजी नगरसेविका निर्मला तांबे, सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, झोन अधिकारी किशोर सातपुते आदी उपस्थित होते.

शनिवारी (ता. २) सोलापूर जिल्ह्यात पालखीचे आगमन झाल्यावर उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथे पालखीचा मुक्कम होता. आज (रविवारी) सकाळी पाणी गिरणी चौक, रूपाभवानी येथे पालखीचे आगमन झाले. मार्गावर विविध संस्थांच्यावतीने रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कुचन प्रशाला येथे पालखीचा रविवारचा मुक्काम आहे. सोमवारी सकाळी उपलप मंगल कार्यालय, सात रस्ता येथे पालखीचे आगमन होणार असून, तिथे रात्री पालखी मुक्कामी असणार आहे. मंगळवारी (ता. ५) पालखी तिऱ्हेमार्गे पंढरपूरला निघणार आहे. तत्पूर्वी दमाणीनगर परिसरात पालखी मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीत ७५० वारकऱ्यांसह वाहन, वाद्य, दोन अश्वस्वार, बँड पथकासह पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय आणि मुक्कामाच्या ठिकाणी लाईट, मंडप आदी व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गजानन महाराजांची पालखी ही एकमेव पालखी अशी आहे की जी सोलापूर शहरातून जाते. त्यामुळे सोलापूरवासीयांनी या पालखीचे मनोभावे दर्शन घ्यावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. खोराटे यांनी केले. श्री गजानन महाराज, शेगाव संस्था हे महाराष्ट्रातील अग्रगण्य देवस्थान म्हणून नावारूपाला आले असून, तेथील स्वच्छता, नियोजन, शिस्तबद्धता यासाठी हे देवस्थान प्रसिद्ध आहे.

दोन सत्पुरुषांची भेट

सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सम्राट चौक येथील प्रभाकर महाराज मंदिरात पालखीचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी संत प्रभाकर हाराज व सद्‌गुरू गजानन महाराज यांची भेट झाली. प्रभाकर महाराज देवस्थान ट्रस्टने वारकऱ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. वारकऱ्यांसाठी गजनान महाराजांचा आवडता पिठलं-भाकर हा प्रसाद केला होता. भाविकांच्या स्वागतासाठी परिसरात स्वच्छता करण्यात आली.

ठळक बाबी

  • महापालिकेकडून पालखी मार्गाची स्वच्छता

  • वाहतूक पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त

  • पालखीच्या दर्शनसाठी भाविकांच्या दुतर्फा रांगा

  • फुलांची उधळण तसेच रांगोळीच्या पायघड्या

  • पालखी सोहळ्यात सर्वत्र शिस्तीचे दर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT