मोहोळ : आषाढीसाठी सावळ्या विठूच्या भेटीसाठी निघालेल्या शेगांव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळयाने बुधवार ता 6 रोजी सकाळी मोहोळ तालुक्यात प्रवेश करताच, शिंगोली - तरटगाव येथे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले .
पालखी सोहळा काल तिऱ्हे ( ता उ. सोलापूर ) येथे मुक्कामी होता. सकाळी सहाच्या सुमारास तिऱ्हे करांचा निरोप घेत सीना नदी पार करून या पालखी सोहळ्याने शिंगोली -तरटगाव येथे मोहोळ तालुक्यात प्रवेश केला. प्रशासनाच्या वतीने गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी स्वागत केले . यावेळी नायब तहसिलदार भालचंद्र यादव, मंडलाधिकारी एस के बेलभंडारे, तलाठी ए आर राठोड, आर एस घुणावत,जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, शिवसेनेचे तालुका प्रमुख अशोक भोसले, शिंगोलीचे सरपंच अविनाश मोटे, उपसरपंच पांडुरंग रासेराव विस्तार अधिकारी संदीप खरबस,व्ही आर देशमुख,तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ अरूण पाथरूटकर यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते .
येथील स्वागता नंतर मेघांनी आच्छादलेल्या सकाळच्या रम्य वातावरणात वारकऱ्यांनी शिस्तबद्ध पावले टाकत कामती कडे मार्गक्रमण केले . पालखीचे आठच्या सुमारास कामती खुर्द येथे आगमन झाले . स्वागता साठी पालखी मार्गावर आकर्षक रांगोंळ्या व फुलांच्या पायघडया घालण्यात आल्या होत्या.या वेळी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, श्रीकांत पाटील,सरपंच सविता माळी, उपसरपंच दीपक काटकर यांच्यासह ग्रामस्थांनी श्री च्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करीत स्वागत केले. यानंतर येथील मैदानात उभारण्यात आलेल्या दर्शन मंडपात श्रीं ची पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. यावेळी ग्रामस्थां सह परिसरातील
भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. ग्रामस्थांच्या वतीने वैष्णव जनांना भोजन देण्यात आले .याकामी श्री संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले . अल्पशा विश्रांती नंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास हरिनामाचा जयघोष करीत वैष्णवजन कामती बुद्रुक कडे मार्गस्थ झाले.तेथे ही ग्रामस्थानी पालखीचे स्वागत केले .त्या नंतर हा सोहळा वाघोली मार्गे पंढरीकडे मार्गस्थ झाला .
दरम्यान पालखी मार्गावर विविध संस्था, संघटना व भाविकांनी वारकऱ्यांना चहा, फराळाच्या साहीत्याचे वाटप केले .कामतीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.