Chaitri Yatra Sakal
सोलापूर

Solapur News : चैत्री यात्रेसाठी पंढरीत लाखो भाविक दाखल

चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी (ता.२) साजरा होत आहे. एकादशी दिवशी लाखो भाविक चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधतात.

राजकुमार घाडगे : सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर : चैत्र यात्रेचा सोहळा व शनिवार रविवार या सलग सुट्ट्यांमुळे पंढरीत लाखोंच्या संख्येने भाविकांचे आगमन झाले आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणामार्ग चंद्रभागा नदीचे वाळवंट व ६५ एकर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरम्यान शनिवारी (ता.१) श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या तीन नंबर नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली होती. श्रींच्या दर्शनासाठी पाच तास लागत होते.

चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी (ता.२) साजरा होत आहे. एकादशी दिवशी लाखो भाविक चंद्रभागा नदीत स्नानाची पर्वणी साधतात. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे चंद्रभागा नदी तुडुंब भरून वाहत आहे. त्यामुळे भाविकांना स्नानासाठी नदीमध्ये पुरेस पाणी आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने चालवण्यात येत असलेल्या मोफत अन्नछत्राचा लाभ लाखो भाविक घेत आहेत. नुकतेच मंदिर समितीने भाविकांसाठी रात्री देखील भोजन उपलब्ध करून दिले आहे.

चैत्री एकादशी दिवशी अन्नछत्रामध्ये भाविकांना खिचडी, भगर, आमटी असे उपवासाचे पदार्थ दिले जाणार आहेत. मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगेतील भाविकांना आळंदी येथील वारकरी सेवा संस्थेच्या स्वयंसेवकांच्या सहाय्याने पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. दरम्यान आज श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग तीन नंबरच्या पत्रा शेड पर्यंत गेली होती. श्रींच्या दर्शनासाठी पाच तास लागत होते. याबाबत सोनाजी भाऊराव जामगे (रा.शिवनी, ता.लोहा, जि. नांदेड) 'सकाळ'शी बोलताना म्हणाले, पहाटे सहा वाजता दर्शन रांगेत उभे होतो. सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन प्राप्त झाले. *चौकट: चंद्रभागा नदीपात्रामध्ये शनिवारी

(ता.१) मोठ्या प्रमाणावर दुचाकी पार्किंग केलेल्या दिसून आल्या. वास्तविक पाहता चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीदेखील शेकडो दुचाकी वाहने अस्तावस्तपणे वाळवंटामध्ये पार्क करण्यात आली होती. रविवारी (ता.२) एकादशी दिवशी चंद्रभागेच्या नदीपात्रामध्ये स्नानासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना या दुचाकी व फिरत्या विक्रेत्यांमुळे अडथळा निर्माण होणार आहे. तरी पोलीस प्रशासनाने या दुचाकी स्वाराना वाळवंटात प्रवेशास मनाई करावी अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : राज्यासह देशभरातील विविध ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT