Shripat Pimpri Riaz Attar has succeeded in the gate examination.jpg
Shripat Pimpri Riaz Attar has succeeded in the gate examination.jpg 
सोलापूर

आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवरच झाले रियाजच्या वडिलांचे निधन ! तरीही दुःखातून सावरत मिळवले गेटमध्ये यश

सकाळ डिजिटल टीम

मळेगाव (सोलापूर) : जिद्द, सुयोग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य, प्रामाणिक प्रयत्न व परिस्थितीची जाण यांची योग्य सांगड घातल्यास अशक्य काहीच नाही हे श्रीपत पिंपरीच्या (ता. बार्शी) रियाज आतारने दाखवून दिले आहे. श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मळेगाव संचलित श्रीमती एस.डी.गणगे प्रशाला, कृष्णानगरचा विद्यार्थी रियाज आतारने गेट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

रियाजने गेट-2021 परीक्षेत 72.37 टक्के गुणांसह बाजी मारली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत 1000 पैकी 761 गुण प्राप्त करीत मेकेनिकल विभागातून यश संपादन केले आहे. रियाजने आठ लाख पाच हजार विद्यार्थ्यांमधून 1000 वी रँक मिळवली आहे. श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथे जन्मलेल्या रियाजने प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेच्या नुतन प्रशाला बाेराडेवाडी, श्रीमती एस.डी गणगे प्रशाला, कृष्णानगर व कै ना.मा गडसिंग (गुरुजी) ज्युनियर काँलेज कृष्णानगर पुणे येथे पूर्ण केले आहे. 

रियाजने पुणे येथील शिक्षण गव्हरमेंट काँलेज आँफ इंजिनियर अवसरी बुद्रुक येथे गेट परीक्षेची तयारी करीत हे उज्वल यश संपादन केले आहे. श्रीमती एस.डी.गणगे प्रशाला, कृष्णानगर येथे आई हाजराबानू आतार यांचे सोबत रियाजचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप, प्राचार्य एच.डी मोरे, उपप्राचार्य तिकटे एस.एस व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. रियाजने इयत्ता बारावीत विज्ञान शाखेत 89.95 टक्के गुण मिळवत वडील रमजान आतार, आई हाजराबानू आतार यांनी केलेल्या कष्टाचे चीज केले. मात्र हा आंनद क्षणिक ठरला, आयुष्याच्या टर्निंग पॉईंट वरती वडिलांच्या निधनाने रियाजच्या जगण्याचा आधारच तुटला व मोठी पोकळी निर्माण झाली. 

कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तेव्हापासून आई शिक्षीका हाजराबानू यांनी मोलाची साथ दिली व रियाजचे शिक्षण पुढे सुरू ठेवले. प्रत्येक यशाच्या मागे संघर्ष असतोच त्यातूनही न डगमगता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायची असते हा विचार समोर ठेवत रियाजने कष्ट, मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे .श्री नर्मदेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पिसाळ व्ही.बी. सचिवा सखुबाई गडसिंग, खजिनदार ज्ञानदेव आगलावे, सहसचिव हेमंत गडसिंग, उपाध्यक्ष प्रमोद जगताप तसेच श्रीपत पिंपरी ग्रामस्थ यांच्या वतीने तिचे अभिनंदन करण्यात आले. सूत्र संचालन भालेकर व्ही.यु यांनी केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: ईव्हीएमबाबत पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : फ्रेझर-मॅकगर्कचं तुफानी अर्धशतक, दिल्लीची मुंबईविरुद्ध आक्रमक सुरुवात

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT