robbery esakal
सोलापूर

शिरवळसारखाच तुळजापूर तालुक्‍यात दरोडा! पोलिसांची घटनास्थळी भेट

शिरवळसारखाच तुळजापूर तालुक्‍यात दरोडा! अक्‍कलकोट पोलिसांची घटनास्थळी भेट

श्रीनिवास दुध्याल

शिरवळ दरोड्यानंतर तीन दिवसांनी बारुळ (ता. तुळजापूर) या गावात त्याच पद्धतीने दरोडा टाकल्याची माहिती अक्‍कलकोट पोलिसांना मिळाली.

सोलापूर : शिरवळ (ता. अक्‍कलकोट) या गावात पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दोन घरांवर दरोडा (Robbery) टाकून सव्वासहा लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. मागील तीन दिवसांपासून पोलिसांची (Police) चार पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. परंतु, अद्याप त्यांचा मागमूस लागलेला नाही. शिरवळ दरोड्यानंतर तीन दिवसांनी बारुळ (ता. तुळजापूर) (Tiljapur) या गावात त्याच पद्धतीने दरोडा टाकल्याची माहिती अक्‍कलकोट (Akkalkot) पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली.

जेवण करून सर्वजण गाढ झोपेत असताना दरोडेखोरांनी 29 ऑक्‍टोबरच्या पहाटे दोनच्या सुमारास शिरवळ येथील दोन घरात धाडसी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी त्या दोन घरातील तिघांना मारहाण करीत घरातून एक लाख 40 हजारांची रोकड व 17 तोळे सोने घेऊन ते पसार झाले. एकूण सहाजण होते, असे दरोडा पडलेल्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी अक्‍कलकोट पोलिसांची दोन तर गुन्हे शाखेची दोन पथके त्या दरोडेखोरांच्या मागावर सोडली आहेत.

त्या दरोडेखोरांचा शोध घेताना तुळजापूर तालुक्‍यातील बारुळ येथे तशाच प्रकारचा दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अक्‍कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी स्वत: त्या गावातील दरोडा पडलेल्या कुटुंबाची भेट घेतली. तसेच तेथील पोलिसांकडूनही माहिती घेतली. पुढील तपासासाठी त्याचा उपायोग होईल, असा पोलिसांना विश्‍वास आहे. दरम्यान, ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे बऱ्याच ठिकाणी चोरीचे प्रयत्न फसले असून सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

...तर नाकाबंदीतून दरोडेखोरांना पकडणे शक्‍य होते

शिरवळ येथे दरोडा पडल्यानंतर काही वेळातच गावातील कोणीतरी बीट अंमलदाराला कॉल केला. परंतु, त्यांनी घटना गांभीर्याने घेतली नाही. त्यांना कॉल करूनही त्यांनी पोलिस ठाण्यातील कोणालाच निरोप दिला नाही. गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ निरोप दिला असता तर नाकाबंदी करून त्यांना पकडता आले असते. परंतु, तसे काहीच झाले नाही, त्यामुळे संबंधित बीट अंमलदाराला सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : हे व्यवस्थेचं अपयश, अशा निवडणुका बघितल्या नाही! निकाल पुढे ढकलल्यानं मुख्यमंत्र्यांची नाराजी; आयोगाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे...

Malegaon Crime : मालेगाव हादरले! एकाच दिवशी अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाचे तीन गुन्हे दाखल; समाजमनात संतापाची लाट

मोठी बातमी! नगरपरिषद-पालिका निवडणुकांची मतमोजणी पुढे ढकलली! नवी तारीख जाहीर, कोर्टाने काय म्हटलं?

Pune Metro : स्वारगेट-कात्रज मेट्रोची निविदा मंजूर; तीन महिन्यांत कामाला होणार सुरुवात

Dhananjay Munde : धनुभाऊ तुमचा इंदौरमध्ये खून झाला असता पण... धनजंय मुंडे यांच्याबाबत आमदाराचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT