Covid 
सोलापूर

बापरे! बार्शीत एकाच दिवसांत 19 जण आढळले कोरोनाबाधित; एकूण संख्या झाली 140 

प्रशांत काळे

बार्शी (सोलापूर) : बार्शी शहर आणि तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून, शुक्रवारी एकाच दिवसांत 19 कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. तालुक्‍यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 140 झाली असून, 158 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी दिली. 

शुक्रवारी (ता. 10) रात्री जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 19 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 
शहरातील आठ स्वॅबचे रिपोर्ट प्राप्त झाले. त्यामध्ये बारंगुळे प्लॉट दोन, जावळे प्लॉट एक, सुभाषनगर पाण्याच्या टाकीजवळ एक, मनगिरे मळा एक, जयशंकर मिल लहूजी वस्ताद चौक दोन, तानाजी चौक एक असे आठजण पॉझिटिव्ह आले आहेत. 

वैराग येथील सहाजण पॉझिटिव्ह आले असून, शिवाजीनगर येथील दोन, चाटी गल्ली येथील तीन, रिकाम टेकडी येथील एक असे आहेत. तालुक्‍यातील नागोबाचीवाडी येथील एक, वाणेवाडी एक, चिंचगाव टेकडी (ता. माढा) एक, पारडी (ता. वाशी) निजामदुरा गल्ली (ता. परांडा) एक असे पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिह आले आहेत. 
तालुक्‍यातील बार्शी शहरातील 65, वैराग 56, नागोबाचीवाडी पाच, बाभळगाव एक, साकतपिंपरी पाच, मुंगशी एक, खांडवी 14, पिंपळगाव सात, मांडेगाव एक, वांगी (ता. भूम) एक, शेटफळ (ता. मोहोळ) एक असे 158 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे डॉ. जोगदंड यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT