सीसीटीव्ही कॅमेरा 
सोलापूर

मंगळवेढ्यात मंदिरावर सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार

हुकूम मुलाणी ​

चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी गावातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे.

मंगळवेढा (सोलापूर): चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी गावातील नागरिकांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे. त्यासाठी गावातील मंदिरावर सायरन व सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पुढाकार घेवून गावची सुरक्षा ग्रामसुरक्षा दलाच्या हाती ही संकल्पना राबविताना सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. गुन्ह्याच्या तपासणीच्या कामाच्या माहितीसाठी त्या मंगळवेढा दौऱ्यावर आल्या होत्या. दौऱ्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे उपस्थित होते.

अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना मार्गदर्शन करून ती सक्रिय राहतील यासाठी उपाययोजना केल्या जातील. प्रत्येक मंदिरावर सायरन बसविल्यास संपुर्ण गाव अलर्ट राहील. तसेच चोऱ्या रोखण्यास मदत होऊन गाव सुरक्षित राहील, सातारा येथे कार्यरत असताना केलेल्या 'आपले गाव आपली सुरक्षा' या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये या पोलीस विभागाच्या संकल्पनेस सहकार्य करावे, असे आवाहन करत लोकसंख्येच्या मानाने पोलीस विभागाकडे अपुरे कर्मचारी असल्याने लोकांच्या मालमत्तेची सुरक्षा करण्यास मर्यादा येतात. तंटामुक्त जिल्हा ही चळवळ महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्या संकल्पनेचे टक्के उद्दिष्टे पूर्ण झाले. गावातील ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांना पोलिसांचा माणूस म्हणून ओळख मिळाली पाहिजे. त्यामुळे गुन्हेगारावर वचक बसून गुन्ह्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होईल.

झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांच्यावतीने ग्रामपंचायतीना सूचित केले जाईल. आमचे अधिकारी प्रत्येक गावात भेट देऊन याबाबत तातडीने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी हे महत्वाचे सणाचे दिवस असून याकाळात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. वाढत्या दुचाकी चोरी ही गंभीर समस्या असून रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून टोळी जेरबंद करण्याची सूचना करत शहरानजीक धर्मगाव रोडवर पडलेल्या दरोड्याचा तपास जलदगतीने होऊन त्यातील गुन्हेगार लवकरच जेरबंद होतील असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: भाडेकरुंमुळे अडचणीत आले पुण्यातले घरमालक! 76 जणांवर गुन्हे दाखल; 'या' चुका पडल्या महागात

Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

Latest Marathi News Live Update : दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू

LPG New Rule: गॅस ग्राहकांसाठी 16 ऑगस्टची डेडलाईन! eKYC न केल्यास रिफिल आणि सबसिडीवर परिणाम; घरबसल्या eKYC कशी कराल?

Vasai Virar Protest : हक्काच्या जागा, ओळखपत्रांसाठी फेरीवाल्यांचा वसई-विरार महापालिकेवर बेमुदत मोर्चा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT