Corona 
सोलापूर

पंढरपूर शहराची वाढली चिंता; आज नवीन सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पडलीय भर 

अभय जोशी

पंढरपूर (सोलापूर) : शहरात आज सकाळी नव्याने सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत, अशी माहिती पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. शहरातील रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शहराच्या अनेक भागात आता रुग्ण आढळू लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. 

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, शहराच्या विविध भागातील सहा व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जुनी पेठ येथे एक पुरुष, संत पेठेमध्ये महापूर चाळ शाळा नंबर नऊजवळ एक पुरुष, सांगोला रोडवर यमाई तुकाईजवळ एक पुरुष, इसबावी येथील बसवेश्वर नगरमध्ये दोन पुरुष तर जिजाऊ नगरमधील एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. 
पूर्वी शहरामध्ये जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, त्यांच्या संपर्कातील या सर्व व्यक्ती आहेत. आज नव्याने सापडलेल्या या सर्व सहा रुग्णांना वाखरी येथील एमआयटीमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

पंढरपूर शहरात आजपर्यंत 47 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी 18 व्यक्ती बऱ्या झाल्या आहेत तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत पंढरपूर तालुका व जिल्हा कनेक्‍शन असलेल्या सात व्यक्ती आणि पंढरपूर शहर व तालुक्‍यातील 21 अशा एकूण 28 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. 

पूर्वी परगावाहून पंढरपूरला आलेले रुग्ण सापडले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर शहरातील व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागले आहेत. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर न पडता सर्वतोपरी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT