सोलापूर

सहा हजार विद्यार्थ्यांची भरली ऑनलाईन शाळा

सकाळ वृत्तसेवा


केत्तूर(सोलापूर)ः सध्या लॉकडाउनमुळे शाळा-कॉलेज सर्वकाही बंद आहे. त्यामुळे दहावी व बारावी या महत्त्वाच्या वर्षांसाठीचा अभ्यास घेता येत नसल्याने या विद्यार्थ्यांची अडचण झालेली होती. शिक्षक व विद्यार्थी शाळेमध्ये येऊ शकत नाहीत. या अडचणीवर अभिनव पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने मात केली आहे. व्हॉट्‌सऍपवर गृहपाठ, यूट्यूबवर लेक्‍चरद्वारे  सहा हजार विद्यार्थी ऑनलाइन शाळेत शिक्षण घेत आहेत. 

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे झूम ऍप्लिकेशनच्या माध्यमातून दररोज विज्ञान भाग एक, विज्ञान भाग 2, इंग्रजी, मराठी, हिंदी, इतिहास व भूगोल या विषयांचे नियमित तास होत आहेत. विद्यार्थ्यांचा देखील या नावहन्यपूर्ण उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना घरी बसून शाळेचा अनुभव दिला जात आहे. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत 30 टक्के अभ्यासक्रम संपलेला असून दोन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. झूम ऍप्लिकेशनबरोबरच व्हॉट्‌सऍप ग्रुपवरून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे. शिक्षकांनी दिलेला होमवर्क विद्यार्थी व्हॉट्‌सऍप ग्रुपवर फोटो काढून पाठवतात. शिक्षक लागलीच तो तपासून विद्यार्थ्यांना कळवतात. 

इयत्ता बारावीसाठी "अभिनव स्कूल वाशिंबे' या प्रशालेच्या यूट्यूब चॅनलवर बारावी विषयाचे लेक्‍चर व्हिडिओ स्वरूपात अपलोड केले जात आहेत. तेथे सध्या सहा हजार सबस्क्रायबर विद्यार्थी रोज शिक्षणाचा लाभ घेत आहेत. तसेच हे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी, अनेक शिक्षक पाहत असून अनेक शाळा व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते व्हिडिओ दाखवले जात आहेत. या डिजिटल माध्यमाचा पुढे जाऊन आणखी प्रभावीपणे वापर करण्याचा मानस असल्याचे संस्था सचिव महादेव झोळ यांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT