slim fit tips sakal
सोलापूर

slim fit tips : स्लिम अन्‌ फिट राहायचंय... मग मैदा टाळा!

मैद्याविषयी माहिती देताना आहारतज्ज्ञ नीलिमा हरिसंगम सांगतात,

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : वाढलेली ढेरी, कंबरेवर सुटलेली चरबी अन्‌ यामुळे आलेला लठ्ठपणा अनेकांना नकोसा झालाय... लठ्ठपणाच्या टोमण्यांनी जर वैतागला असाल तर स्लिम अन्‌ फिट राहण्यासाठी प्रयत्न करायलाच हवेत. स्पर्धेच्या अन्‌ धकाधकीच्या युगात स्लिम अन्‌ चोवीस तास फिट राहण्यासाठी अनेकजण अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. त्यात आहार आणि विहार महत्त्वाचा मानला जातो. स्लिम्‌ अन्‌ फिट राहण्यासाठी मैदा खाण्याचे कटाक्षाने टाळायलाच हवे.

पूर्वी दिवाळीनिमित्त किंवा कधी तरी सणानिमित्त मैद्याने बनवलेले पदार्थ खाण्यात येत होते. आता मैद्याचा वापर सर्रास वाढल्याने अनेकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मैद्याविषयी माहिती देताना आहारतज्ज्ञ नीलिमा हरिसंगम सांगतात, मैदा किंवा मैद्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ शरीरावर वाईट परिणाम करतात. मैदा गव्हापासून बनवितात. गहू हा आरोग्यासाठी चांगला असला तरीही मैदा आरोग्यासाठी धोकादायक आहे. मैदा तयार करताना गव्हावरील साल काढली जाते. त्यामुळे गव्हात असणारे पोषक व तंतुमय घटक निघून जातात. गव्हातील फायबर निघून जाते. मैद्यामध्ये आयर्न आणि कॅल्शिअमचे प्रमाण अति कमी असल्याने हाडांची समस्या उद्‌भवते, रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते.

शरीराला आवश्‍यक पोषक घटक

कॅलरीज : २ हजार किलो

प्रथिने : ६० ग्रॅम

फॅट : २० ग्रॅम

कॅल्शिअम : ४०० मिलिग्रॅम

आयर्न : २८ मिलिग्रॅम

सोल्युबल फायबर : २० ते ३० ग्रॅम

(बैठे काम करणाऱ्या साधारण व्यक्तीला रोज या पोषण घटकांची आवश्‍यकता असते. व्यक्तीला त्याच्या आरोग्यानुसार, त्याच्या वजनानुसार, त्याच्या वयानुसार, महिला आणि पुरुषाला या पोषण घटकांची आवश्‍यकता असते. पोषण घटकांच्या आकडेवारीमध्ये बदल होतो. संदर्भ : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, हैदराबाद)

मैद्यापासून बनतात हे पदार्थ

बेकरीमधील बहुतांश पदार्थांसह बिस्किटे, ब्रेड, खारी, समोसा, केक, तंदुरी रोटी, शंकरपाळी, हॉटेलमधील पुरीभाजी या पदार्थांमध्ये मैद्याचा मोठ्या किंवा कमीअधिक प्रमाणात वापर केला जातो. मैद्याऐवजी गहू, भिजवलेला रवा, बाजरी, तांदूळ, नाचणी या धान्यांचा आहारात समावेश केल्यास विविध पदार्थांमधून शरीरात जाणारा मैदा रोखता येईल.

तंदुरी रोटीपेक्षा चपातीच चांगली

आहारतज्ज्ञ नीलिमा हरिसंगम सांगतात, होते. मैदा भरपूर तेल शोषून घेत असल्याने मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे अपायकारक आहे. जिभेची चव म्हणून कधीतरी एकदा ठीक आहे. लहान मुलांची आणि वयस्कर मंडळींची पचनशक्ती कमकुवत होण्याची भीती असते. काही पालक मुलांना पोळी-भाजी देण्याऐवजी रेडिमेड मैद्याचे काहीतरी पदार्थ डब्यात देतात. मैदा खाण्याऐवजी चपाती खाल्लेली कधीही चांगली. तंदुरी रोटीसाठी मैदा वापरला जातो. वारंवार तंदुरी रोटी खाण्यापेक्षा चपाती किंवा भाकरी आरोग्यासाठी लाभदायक आहे.

चरबी वाढते, मधुमेहाची भीती

मैद्याच्या सेवनाबद्दल डॉ. मुक्तेश्‍वर शेटे सांगतात, मैदा हा नेहमी खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. मैदा किंवा मैद्याचे पदार्थ कधी तरी चवीसाठी खावे. मैद्याचे नियमित सेवन केल्यास चरबी वाढणे, मधुमेह, रक्तदाब यासह इतर आजार बळावण्याची शक्‍यता असते. मैद्याचे नियमित सेवन होत असेल तर ते टाळायलाच हवे. जंकफूड, फास्टफूड यामध्ये मैद्याचा अधिक वापर केला जातो. आरोग्याची काळजी म्हणून हे पदार्थ नियमित खाताना प्रत्येकाने विचार करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

Asia Cup 2025: 'माणसाच्या जीवाची किंमत शून्य; IND vs PAK सामना पाहाणार नाही', माजी क्रिकेटपटू बरसला

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Gaza City: ‘गाझा सिटी’ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार

SCROLL FOR NEXT