रिक्षा solapur news esakal
सोलापूर

Solapur : रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई

सोलापुरातील १४ हजार रिक्षांचे अद्याप झाले नाही मीटर प्रमाणीकरण

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर तब्बल १६ हजार रिक्षा चालतात. दहा वर्षांनी रिक्षाचे भाडे वाढले आणि १८ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, रिक्षा चालकांनी ९० दिवसांत मीटर प्रमाणीकरण करून घेण्याचे बंधन होते.

आता १०० दिवस होऊनही केवळ सतराशे रिक्षांनीच मीटर प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यामुळे आता उद्यापासून (मंगळवार) मीटर प्रमाणीकरण न करता ज्यादा भाडे घेणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे.

ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा निर्णय २०१२-१ मध्ये झाला होता. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रिक्षाची भाडेवाढ करण्यास मान्यता दिली. कोरोना काळात अडचणीचा सामरा त्यांना करावा लागला होता. इंधन दरवाढीमुळे त्यांना जुने भाडे परवडत नाही म्हणून १५ जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी प्रवाशांना १५ रुपये मोजावे लागत आहेत. महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ यावेळेत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारणीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागातील रिक्षांना रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत ४० टक्के भाडे आकारणीस मान्यता आहे.

रिक्षातील प्रवाशांसोबत आणलेल्या मोठ्या आकाराच्या साहित्याला पाच रुपयांचे भाडे घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. पण, मुदतीत मीटर प्रमाणीकरण न करणाऱ्या रिक्षांना ही भाडेवाढ लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आता त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

...तर ४० दिवसांसाठी परवाना निलंबीत

ऑटोरिक्षांमधील मीटरचे कॅलिब्रेशन (प्रमाणीकरण) ३१ ऑक्टोबरपर्यंत करून घेणे अपेक्षित आहे. मुदतीत मीटर प्रमाणीकरण न केल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी संबंधित रिक्षाचा परवाना एक दिवसांसाठी निलंबित केला जाणार आहे. मीटर कॅलिब्रेशनसाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण, मुदतीत कॅलिब्रेशन करून न घेतल्याने आता जास्तीत जास्त ४० दिवसांसाठी त्या रिक्षाचा परवाना निलंबीत केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

Fifa World Cup 2026 : किलियन एम्बाप्पेचा पराक्रम! लिओनेल मेस्सी, रोनाल्डोला सोडलं मागे; फ्रान्सच्या विजय अन् बाद फेरीत प्रवेश

निधी मिळत नाही बोंब मारणाऱ्या खासदारांची गोची करणारी आकडेवारी! २ वर्षांत ६ जणांना मिळाले १०० कोटी, जनतेसाठी वापरले फक्त १३ कोटी

Latest Marathi News Live Update : अधिक मासात त्र्यंबकेश्वराला साडेसहा कोटींची देणगी, ११ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट? वीज बिल तिप्पट झाल्याचा ग्राहकांचा गंभीर आरोप, राज्यात संतापाचे वातावरण

SCROLL FOR NEXT