malnutrition sakal
सोलापूर

चिंता वाढली ... राज्यात ८२ हजार कुपोषित बालके

दोन वर्षांत साडेतीन हजार कोटींचा खर्च; गोधडी प्रकल्प गुंडाळला

तात्या लांडगे

सोलापूर: राज्याला कुपोषणापासून मुक्‍त करण्यासाठी ‘कुपोषणमुक्‍त महाराष्ट्र’ ही मोहीम सुरु करण्यात आले. त्याअंतर्गत दोन वर्षांत तीन हजार ६०७ कोटी रुपयांचा खर्च झाला. तरीही, कुपोषणग्रस्त बालकांची संख्या कमी होऊ शकलेली नाही. राज्यात सध्या ८१ हजार ९०४ कुपोषित बालके असून तब्बल पाच लाख मुले कुपोषणाच्या (मध्यम) उंबरठ्यावर आहेत.

गर्भारपणात सकस आहार मिळावा, प्रसूतीनंतर काही महिन्यांपर्यंत बालकासाठी पुरेसा वेळ देता यावा म्हणून नीती आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ८० ठिकाणी ‘गोधडी प्रकल्प’ राबविण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, अमरावती तर पुढील टप्प्यात पुणे, धुळे, चंद्रपूर जिल्ह्यात अशा पद्धतीने टप्प्याटप्याने तो प्रकल्प राबविण्याचेही निश्‍चित झाले होते. या प्रकल्पातून गर्भवती, स्तन्यदा मातांना सहा महिन्यांपर्यंत त्यांच्या मुलांचे पालनपोषण नीटनेटकेपणाने करता यावे म्हणून त्यांना गोधडी शिवण्याचे काम दिले जाणार होते. अंगणवाडीत बसूनच मुलाकडे लक्ष देत त्यांना हे काम करण्याची मुभा होती. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव सध्या हा प्रकल्प गुंडाळण्यात आल्याने गर्भवती व स्तन्यदा मातांना त्यांच्या बाळांना घरी सोडून कामाच्या शोधात वणवण भटकावे लागत असल्याचेही चित्र आहे. राज्यातील ५५२ एकात्मिक बालविकास प्रकल्पांद्वारे कुपोषणमुक्‍तीचा प्रयत्न होत असून कुपोषित मुलांबरोबरच कुपोषण वाढणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

दरवर्षी १,८०३ कोटींचा खर्च

कुपोषणमुक्‍त महाराष्ट्राअंतर्गत सामान्य व मध्यम मुलासाठी दररोज प्रत्येकी आठ रुपयांचा तर तीव्र स्वरूपाच्या कुपोषित मुलामागे साडेनऊ रुपयांचा खर्च केला जातो. २०२० मध्ये राज्यातील ६० लाख ८० हजार १७७ बालकांपैकी पाच लाख ३२ हजार ९४८ बालके मध्यम तर ८९ हजार १५१ बालके तीव्र कुपोषित आढळली. मागील वर्षी राज्यातील ६१ लाख ६१ हजार २५ संशयित बालकांमध्ये ८१ हजार ९०४ बालके तीव्र स्वरूपाची कुपोषित असल्याची बाब समोर आली. कुपोषणमुक्‍तीसाठी दररोज पाच कोटी तर दरवर्षी एक हजार ८०३ कोटींचा खर्च करूनही या मोहिमेला अपेक्षित यश मिळालेले नाही.

‘कुपोषणमुक्‍त महाराष्ट्र’ ही मोहीम दोन वर्षांपासून राबविले जात आहे. त्याअंतर्गत कुपोषित (सामान्य, मध्यम व तीव्र) बालकांना व व स्तन्यदा मातांना पोषक आहार दिला जातो. गेल्या वर्षाच्या तुलनेत कुपोषित बालकांची संख्या जवळपास आठ हजाराने कमी झाली आहे.

- गोकूळ देवरे, उपायुक्‍त, आरोग्य व पोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT