अपघातात तीन वर्षाचा चिमुकला ठार, दोन जखमी sakal
सोलापूर

सोलापूर : अपघातात तीन वर्षाचा चिमुकला ठार, दोन जखमी

हा अपघात शुक्रवारी 29 अक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास झाला

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : पत्नी व मुलासह दिवाळीच्या सणासाठी सासुरवाडी माढा येथे सोडण्यासाठी निघालेल्या बोराटे यांच्या मोटारसायकलला कुर्डू ता माढा येथील माळी पाटी जवळ अज्ञात टेम्पोने जोराची धडक देऊन तीन वर्षे लहान जागीच मृत्यू झाला. तर पती पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

हा अपघात शुक्रवारी 29 अक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास झाला असुन शिवराज शरद बोराडे वय 3वर्षे हा मयत चिमुकल्यांचे तर शरद अनंता बोराडे वय 29 वर्षे,सौ.विनया शरद बोराटे वय 28वर्षे हे पती पत्नी रा.प्रयाग धाम रोड बगाडे वस्ती, उरुळीकांचन,ता हवेली जिल्हा पुणे अशी जखमींची नावे आहेत. टेम्पो चालक न थांबता वाहनांसह फरार झाला आहे.या अपघातात मोटारसायकल चे मोठं नुकसान झालं आहे.

जखमी पती पत्नी वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात रात्री 11.44 वाजता दाखल करण्यात आला आहे.

शरद अंनंता बोराटे हे आपल्या कुटुंबसह हे उरुळी कांचन येथून MH12QQ2721 या क्रमांकाच्या मोटारसायकल वरुन सासुरवाडी माढा येथील पेपर विक्रेते दिनकर चव्हाण यांच्या कडे पत्नी विनया व मुलगा शिवराज यांना दिवाळीच्या सणासाठी सोडण्यासाठी जात असताना कुर्डू हद्दीतील माळी पाटी जवळ आले असता अज्ञात टेम्पो ने जोराची धडक देऊन न थांबता निघून गेला. लेक,नातु,जावई आत्ता थोड्याच वेळात घरी येणार हे आनंदाचे वातावरण असतना नातु मेल्याची खबर मिळताच त्यांच्या आनंदावर विरजण पडले चव्हाण व बोराडे यांच्या कुटुंबावर येन सनासुदिच्या वेळी दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT