राजू शेट्टी, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना Esakal
सोलापूर

Solapur : कृषिमंत्र्यांना ओला दुष्काळ दिसेना; राजू शेट्टी

‘एफआरपी’चे सूत्र इथेनॉल निर्मितीवर करण्याची मागणी

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर : सगळ्या पिकांची राखरांगोळी झाली तरी राज्याच्या कृषिमंत्र्यांना ओला दुष्काळ दिसत नाही, असा टोला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी येथे लगावला. येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी (ता. ३१) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Solapur श्री. शेट्टी म्हणाले, राज्यात अतिवृष्टीने ऊस वगळता सर्व पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. कृषिमंत्र्यांना मात्र ओला दुष्काळ दिसत नाही. त्यांचा अनुभव कदाचित आमच्यापेक्षा जास्त असावा असे वाटते. पीकविमा कंपन्यांनी दिवाळीसाठी आधी नुकसानीचा अग्रीम द्यायला हवा होता. महसूलचे तलाठी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत. राज्य सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही.

शंभर दिवस झाले तरी राज्य सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. राज्यातील २०० साखर कारखान्यांनी उसाच्या वजनात काटामारी करत ऊस उत्पादकांचे साडेचार हजार कोटी रुपये लुबाडले आहेत. प्रत्येक कारखान्यातील वजन काटे हे संगणकीकृत करावेत, अशी मागणी आम्ही वजने व मापे खात्याचे महानियंत्रक रवींद्र सिंघल यांच्याकडे केली आहे.

इथेनॉल निर्मितीतून साखर कारखाने जादा उत्पन्न मिळवत आहेत. पण ऊस उत्पादकांना कमी मोबदला दिला जातो. त्यामुळे इथेनॉल उत्पादनाच्या आधारावर एफआरपीचे सूत्र बदलण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यात इथेनॉल निर्मितीमधून लोकमंगल कारखान्याने ३० कोटी ५१ लाख, युटोपियन कारखान्याने ४५ कोटी, विठ्ठलराव शिंदे कारखान्याने क्रमांक एकने १५२ कोटी जादा उत्पन्न मिळवले आहे.

त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक ३०० रुपये उत्पादकांना द्यायला हवेत, असेही श्री. शेट्टी म्हणाले.यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, पदाधिकारी नितीन बागल, विकास रणदीवे, समाधान पाटील आदी उपस्थित होते.

गुऱ्हाळांना इथेनॉल निर्मिती आवश्यक

गुऱ्हाळ हा पारंपरिक उद्योग शेतकरी ग्रामीण उद्योग म्हणून करतात. सरकार गावपातळीवर उद्योगांना चालना देण्याचे धोरण राबवते. त्याप्रमाणे या शेतकऱ्यांना देखील ईथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. इथेनॉल निर्मिती हा काही साखर कारखानदारांचा मक्ता नाही, हे लक्षात घ्यावे, असे श्री. शेट्टी यांनी यावेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT