sambhaji brigade andolan 
सोलापूर

सोलापुरची विमानसेवा सुरळीत होईना 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापुरातील होडगी रोड येथील विमानतळावरुन विमानसेवा सुरळीत करावी, अडथळ्यांचा तिढा सोडवावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने शहराध्यक्ष श्‍याम कदम यांच्या नेतृत्वाखाली विमानांची यात्रेतील प्रतिकृती उडवून आज आंदोलन केले. 

सोलापुरातील होडगी रोड येथील विमानतळावरुन विमानसेवा रात्रंदिवस सुरु करावी, अशी उद्योगांसह सर्वच क्षेत्रातून होऊ लागली आहे. मात्र, विमानतळावर रात्रीचे उडाण होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. विमानसेवा सुरळीत न झाल्याने चित्रपट अभिनेते, कलाकार, व्यापारी व उद्योजक, शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय नेतेमंडळींनी सोलापुकडे पाठ फिरवली आहे. तसेच सोलापुरातील उत्पादित टेरी टॉवेल व अन्य उद्योजकांचा देश-विदेशातील बाजारपेठेशी संपर्क वाढला असतानाही विमानसेवेचा तिढा सुटलेला नाही. केंद्र शासनाने सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून घोषित केले असून सोलापुरात पंचतारांकित हॉटेलही सुरु झाले आहे. उद्योग वाढीला सोलापुरात मोठी संधी असून विमानसेवा असणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव अन्‌ अधिकाऱ्यांचा काणाडोळा यामुळे अद्याप विमानसेवा सुरळीत झालेली नाही. 


हे होतील फायदा 
विमानसेवा सुरळीत झाल्यास उद्योगधंदे वाढतील, परदेशी पर्यटकांत वाढ होईल, त्यातून व्यवसायाला फायदा होईल, या हेतूने सोलापुरातील विमानसेवा सुरळीत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका व जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने लक्ष घालून विमानसेवा तत्काळ सुरु करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या वेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, उपाध्यक्ष श्रीमंत पात्रे, उपाध्यक्ष अशितोष माने आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

Truck Eicher Accident : भरधाव ट्रकची आशरला पाठीमागून धडक; भिषण अपघातात दोघांचा मृत्यू, ८ शेळ्या दगावल्या

फक्त ३३ किमी रुंद असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे कशी जातात?

आश्रमशाळांना युद्धाची झळ, गॅस तुटवड्याचा १८ हजार विद्यार्थ्यांना फटका; भोजन व्यवस्थेसमोर मोठे संकट

नाना पाटेकर ते नसीरुद्दीन शाह, एमएक्स प्लेयरवर २०२६ मध्ये येणार १५० नवीन शो; सगळे पाहता येणार फ्री

SCROLL FOR NEXT