Announces Drama Conference Award 
सोलापूर

वनसाळे, मार्डीकर यांना नाट्यपरिषदेचा पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक, रंगकर्मी लक्ष्मीनारायण बोल्ली जीवनगौरव पुरस्कार हा सुशीला वनसाळे यांना तर ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीनारायण आकेन विशेष रंगकर्मी पुरस्कार सुहास मार्डीकर यांना देण्यात येणार असल्याची घोषणा शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सोलापूर उपनगरीय शाखेने नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेले आहे. सोलापूरची नाट्यचळवळ गतिमान व्हावी, मुंबई, पुण्याच्या धर्तीवर सोलापूरच्याही नाट्यपरंपरेचा गौरव व्हावा या दृष्टीने यावर्षी रंगकर्मीच्या स्मरणार्थ हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

हा पुरस्कार वितरण सोहळा सोहळा शनिवारी (ता. 1) डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार असल्याचे श्री. साळुंखे यांनी सांगितले. या वर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत व इतर स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या कलावंतांचाही गौरव करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

या पत्रकार परिषदेप्रसंगी जयप्रकाश कुलकर्णी, राजासाहेब बागवान, प्रशांत शिंगे, कृष्णा हिरेमठ, राजा जाधव, शोभा बोल्ली, मीरा शेंडगे, अनुजा मोडक उपस्थित होते. 

यांना जाहीर झाले पुरस्कार 
- कल्पना काळे बालरंगकर्मी स्मृर्ती पुरस्कार ः तपस्या हिरेमठ 
- विष्णू संगमवार रंगकर्मी स्मृती पुरस्कार ः श्रावण डावरे 
- गौसभाई शेख रंगकर्मी स्मृती पुरस्कार : उमेश बटाणे 
- सुहास वर्तक रंगकर्मी स्मृती पुरस्कार : शांता येळंबकर 
- राजू मोडक रंगकर्मी स्मृती पुरस्कार : राजू मोहोळकर 
- महेश जोशी रंगकर्मी स्मृती पुरस्कार : अशोक किल्लेदार 
- आनंद कुलकर्णी रंगकर्मी स्मृती पुरस्कार : आशुतोष नाटकार 
- जितेश देडे रंगकर्मी स्मृती पुरस्कार : श्रीनिवास देशपांडे 
- आनंद तुळशीगार बालरंगकर्मी स्मृती पुरस्कार : वरद गोरे 
- प्रमोद खांडेकर रंगकर्मी स्मृती पुरस्कार : निशिगंधा कापरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Sangli Fake IT Raid Case: 'स्पेशल 26' चित्रपटाप्रमाणे डॉक्टरच्या घरावर आयकर छापा, सोने व रोकड लंपास | Sakal News

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

SCROLL FOR NEXT