solapur bhaiya chowk railway bridge heavy vehicle transport traffic police 
सोलापूर

Solapur News : भैय्या चौकातील धोकायदायक रेल्वे पुलावरून बिनधास्त जडवाहतूक

ओव्हरलोड वाहतुकीमधून ब्रीज होतोय आणखी कमकुवत; नियमबाह्य वाहतुकीला ‘खाकी’वर्दीचा आशीर्वाद

सकाळ वृत्तसेवा

- रवी ढोबळे

सोलापूर : सोलापूर शहरातील भैया चौक परिसरातील रेल्वे पूल प्रकल्प मागच्या अनेक दिवसांपासून प्रत्यक्ष साकारण्याऐवजी तो फायलीत अडकला आहे. दरम्यान, या पुलावरून जड वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले असले तरी या ठिकाणाहून बिनधास्तपणे वाहतूक सुरु आहे.

परिणामी कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वे, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांची या पूल उभारणीसंदर्भात कमालीची अनास्था दिसत आहे.

दरम्यान, आयुष्य मर्यादा संपलेल्या पुलावरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हा पूल आणखीनच कमकुवत होत आहे. येथून होणाऱ्या जडवाहतुकीला ‘खाकी’वर्दीचाच आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची स्थिती आहे.

सोलापूर -मंगळवेढा रोडवरील भैय्या चौक या दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने रेल्वे विभागाने त्याला धोकादायक ठरवत सोलापूर महानगरपालिकेला आणि रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय विभागाला पत्र व्यवहार केला आहे.

सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या चौपदरीकरणाच्या कामात भैय्या चौकातील रेल्वे उड्डाण पूल नव्याने बांधण्याचे काम सुरु होणार होते. मात्र, रेल्वे विभाग, महापालिका प्रशासन, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने काम रखडल्याचे चित्र दिसत आहे.

१० मार्च २०२३ पासून भैय्या चौकातील या रेल्वे पुलावरून जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली असून या रेल्वे पुलाचे आयुष्यमान संपले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी याबाबत आदेश काढले होतेे.

तथापि, सोलापूर- मंगळवेढा रोड वरून एसटी बस वगळता खासगी बस, वाळू, मुरूम यांची वाहतूक करणारे जड वाहने टिप्पर बिनधास्तपणे सुरु आहेत. कोणताही अनुचित दुर्घटना घडू नये, यासाठी या रेल्वे पुलावर हाईट बेरर लावणे गरजेचे आहे.सोलापूर महानगरपालिकेकडून याबाबत कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही.

पोलिस म्हणतात, महापालिकेने करावी उपाय योजना

या रेल्वे पुलावरून सुरू असणाऱ्या जडवाहतुकीबद्दल शहर वाहतूक विभागाच्या संबंधित सूत्रांना विचारले असता, या रेल्वे पुलावरून जड वाहतूक होताना आढळल्यास पोलिसांकडून तत्काळ कारवाई होते. तथापि, येथे २४ तास पोलिस थांबू शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेने योग्य ती उपाययोजना करायला हवी.

दोन दिवसांपूर्वी श्री संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी याच रस्त्यावरून गेली आहे. भैया चौक परिसरा कामगारांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक बंद होऊन या रेल्वे पुलाचे काम लवकर सुरू करण्यात यावे, ही मागणी रास्त आहे.

पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या? याबाबत महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरअभियंता लक्ष्मण चलवादी यांनी अजबच उत्तर दिले. ‘आम्ही सुट्टीवर असतानाही काम करायचं का? तुम्हाला पाहिजे ती माहिती देण्यासाठी आम्ही बांधील नाही अशी उत्तरे संबंधित महापालिकेच्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

- सारंग तारे,अध्यक्ष, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती

भैया चौकातील पुला उभारणी संदर्भात रेल्वे विभागाकडून निविदा आलेली नाही. त्या संदर्भात प्रक्रिया सुरु आहे. येथील रेल्वे पुलाचे लवकरच काम सुरु होणार आहे.

- संजय कदम, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर मंगळवेढा रोडवरील भैय्या चौक येथील रेल्वे पुलावरून जड वाहतूक बंद असल्याचा आम्ही बोर्ड लावला आहे. तरीही जड वाहतूक बंद होत असेल तर ‘हाईट बेरर’ लावण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.

- लक्ष्मण चलवादी, नगरअभियंता, महापालिका सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT