bjp agens maharashtr govt
bjp agens maharashtr govt 
सोलापूर

मद्यालये सुरू मात्र देवालये बंद, उद्धवा, धुंद तुझे सरकार ! 

सकाळवृत्तसेवा


सोलापूर : भाजपकडून राज्यभर सुरू असलेल्या मंदिरे खुली करा या आंदोलनाचा भाग म्हणून सोलापूर येथील मल्लिकार्जुन मंदिरासमोर सोलापूर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचन यन्नम यांनी आंदोलन छेडले. 
यावेळी टाळ मृदंगच्या गजरात महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद असलेले मंदिराचे दरवाजे उघडावेत याकरिता भाविकांनी अनेकवेळा मागणी केली, राज्यव्यापी घंटानाद आंदोलन केले, तरीही महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. उलट राज्यात मंदिरेचे बार उघडण्यात आले. 
मंदिर बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार!, अशी अवस्था झाली आहे. मंदिरे कधी उघडली जाणार याची महाराष्ट्रातील जनता वाट पाहतेय. अनेक भक्त मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय जेवत नाहीत, असे खासदार महास्वामी यांनी यावेळी सांगितले. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या समन्वयातून शहरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरांसमोर भाविकांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. विविध संप्रदायाचे साधु-संत, धर्माचार्य, पुरोहित उपोषणात सहभागी झाले. फूल-प्रसाद विक्रेते, मंदिरांवर उपजीविका अवलंबून असलेले सर्व व्यावसायिक हे सुद्धा उपोषणात सहभागी होते. या लाक्षणिक उपोषणाला भारतीय जनता पार्टी संपूर्ण पाठिंबा देत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते सक्रीय सहभागी होते. 

संपादन : अरविंद मोटे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT