Corona
Corona esakal
सोलापूर

ब्रेकिंग! सोलापूर शहर कोरोनामुक्‍त! सात दिवसांपासून एकही रुग्ण नाही

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांपाठोपाठ आता सोलापूर शहर कोरोनामुक्‍त झाले आहे. बुधवारी (ता. 16) सलग सातव्या दिवशी शहरात एकही रुग्ण आढळला नाही. तर उल्लेखनिय बाब म्हणजे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या शून्य झाली आहे. दुसरीकडे पंढरपूर शहर, करमाळा, माढा, माळशिरस या शहरातील कोरोना हद्दपार झाला आहे. मंगळवेढा व बार्शीचा ग्रामीण भाग कोरोनामुक्‍त झाला आहे.

कोरोनाचे संकट आता संपुष्टात येऊ लागले आहे. जगातील काही देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट सुरु झाली आहे, पण आपल्याकडे कोरोनाची पुन्हा लाट येईल, यासंदर्भात अजूनपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने काहीही स्पष्ट केलेले नाही, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांनी दिली. तरीही, नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सोलापूर शहर-जिल्हा कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये रुग्णवाढ व मृत्यूदरात राज्याच्या टॉपटेन जिल्ह्याच्या यादीत राहिला. त्यावेळी स्मशानभूमीतदेखील वेटिंग पहायला मिळाले. पण, कोविशिल्ड व कोवॅक्‍सिन या प्रतिबंधित लसींमुळे कोरोनाची तीव्रता कमी झाली आणि तिसऱ्या लाटेत तीव्र लक्षणे असलेले रुग्ण अत्यल्प राहिले. सोलापूर ग्रामीणमध्ये आतापर्यंत एक लाख 86 हजार 32 तर शहरात 33 हजारांहून अधिक व्यक्‍ती कोरोना बाधित झाले. त्यापैकी पाच हजार 231 रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आणि दोन लाख 20 हजारांवर रुग्ण कोरोनामुक्‍त झाले. सध्या शहरातील तीन तर ग्रामीणमधील 20 रुग्ण उपचार घेत आहेत.

  1. कोरोनामुक्‍त तालुके व शहरे
    - सोलापूर शहर कोरोनामुक्‍त; 33 हजार 660 रुग्णांपैकी 32 हजार 155 रुग्णांची कोरोनावर मात
    - अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त
    - करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर शहरात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही
    - मंगळवेढा व बार्शी तालुक्‍याच्या ग्रामीण भागातून कोरोना झाला हद्दपार
    - सोलापूर शहरात कोरोनाचे अवघे तीन सक्रिय रुग्ण; ग्रामीणमधील 20 रुग्ण घेताहेत उपचार

अक्‍कलकोट, पंढरपूरची स्थिती
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत पंढरपूर तालुक्‍यातील 36 हजार 574 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील तब्बल 672 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एकावेळी तालुक्‍यातील सर्वच रुग्णालयांमधील खाटा हाऊसफुल्ल झाल्याने त्यांना सोलापूर शहरातील रुग्णालयातून उपचार घ्यावे लागले. सध्या पंढरपूर शहर पूर्णपणे कोरोनामुक्‍त झाले असून पंढरपूर ग्रामीणमध्ये केवळ तीन रुग्ण आहेत. दुसरीकडे श्री स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट आता पूर्णपणे कोरोनामुक्‍त झाले आहे. तत्पूर्वी, या तालुक्‍यातील चार हजार 840 रुग्णांपैकी 211 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आता तालुक्‍यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT